कल्याण लोकग्राम पादचारी पुलाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण होणार, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते भूमीपूजन

By मुरलीधर भवार | Published: June 17, 2023 05:51 PM2023-06-17T17:51:25+5:302023-06-17T17:52:39+5:30

पादचारी पूलामुळे कल्याण पूर्व भागातील नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Work of Kalyan Lokgram pedestrian bridge will be completed by the end of March 2024 | कल्याण लोकग्राम पादचारी पुलाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण होणार, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते भूमीपूजन

कल्याण लोकग्राम पादचारी पुलाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण होणार, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते भूमीपूजन

googlenewsNext

कल्याण-कल्याणमधील लोकग्राम पादचारी पूलाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण करणार असून हा पादचारी पूल नागरीकांसाठी खुला केला जाईल अशी ग्वाही कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज येथे दिली.

लोकग्राम पादचारी पूलाच्या कामाचे भूमीपूजन खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड, आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी महापौर विनीता राणे, शिवसेना पदाधिकारी गोपाळ लांडगे, मल्लेश शेट्टी, दीपेश म्हात्रे, महेश गायकवाड, निलेश शिंदे, प्रशांत काळे, विशाल पावशे, आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी खासदार शिंदे यांनी सांगितले की, लोकग्राम पादचारी पूल अरुंद होता. त्याला पाडून नव्याने तयार करण्यात येणार आहे. या पूलासाठी लागणारा ७८ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत दिला असून पहिल्या टप्प्यातील ४२ कोटी ५० लाखाच्या निधीतून सिव्हील वर्क सुरु करण्यात आले आहे. उर्वरीत निधीतून अन्य काम केले जाणार आहे.

या पादचारी पूलामुळे कल्याण पूर्व भागातील नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  या प्रसंगी भाजप आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळाली आहे. मोठ्या प्रमाणात प्रकल्प मार्गी लावण्याकरीता निधी उपलब्ध करुन दिला जात आहे.

Web Title: Work of Kalyan Lokgram pedestrian bridge will be completed by the end of March 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.