स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे संथगतीने; केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 02:08 PM2022-01-06T14:08:59+5:302022-01-06T14:09:49+5:30
Kalyan : कपिल पाटील यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कल्याण स्टेशन परिसराचा विकास, काळा तलाव आणि सिटी पार्क या तिन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली.
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या प्रकल्पांची पाहणी आज केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी केली. स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे संथ गतीने सुरु असल्याची बाब केंद्रीय मंत्री पाटील यांनी नमूद केली आहे.
मागच्या महिन्यात पार पडलेल्या दिशा कमिटीच्या बैठकीत स्मार्ट सिटी प्रकल्पांचा विषय मांडण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय मंत्री पाटील यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामाविषयी विचारणा करीत ही कामे जलगगतीने व्हावी असा मुद्या उपस्थित केला होता. त्यावेळी प्रशासनाकडून कोविडमुळे प्रकल्पांना विलंब होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यावेळी सुरु असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते.
त्यानुसार आज पाटील यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कल्याण स्टेशन परिसराचा विकास, काळा तलाव आणि सिटी पार्क या तिन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी पश्चात पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शंभर शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड केली. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महापलिकेची निवड करण्यात आली.
या स्मार्ट सिटी प्रकल्पांकरीता केंद्र, राज्य आणि महापालिकेचा निधी खर्च होत आहे. मात्र कल्याण डोंबिवलीतील प्रकल्पांचे काम संथ गतीने सुरु असल्याचा मुद्दा पाटील यांनी अधोरेखीत करीत प्रकल्पांच्य कामांना गती द्या. नागरिकांच्या हिताची कामे जी स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या डीपीआरमध्ये नव्हती. त्यांचाही समावेश करण्यात यावा अशी सूचना त्यांनी महापालिका प्रशासनास केली आहे. काळा तलावाचे नाव भगवा तलाव झालेले नसून अद्याप काळा तलावच आहे असे विधान करीत पाटील यांनी शिवसेनेला चिमटा काढला.
जितेंद्र आव्हाड यांची टीका ओबीसी समाजाचा अपमान करणारी - पाटील
जितेंद्र आव्हाड हे फार उच्च कोटीचे नेते आहे. ओबीसीवर भरोसा नही. ते कशासाठी भरोसा नाही हे मला माहिती नाही. ज्या मतदार संघातून ते निवडून येतात. त्याठिकाणचे ओबीसी त्यांना मदत करीत असली. त्यांना नेमके काय म्हणायचे होते हे माहिती नाही. त्यांचे वक्तव्य हे ओबीसी समाजाचा अपमान करणारे आहे. स्वत:ला सेक्यूलर समजणारे लोकं जेव्हा एका जातीच्या घटकाबद्दल वक्तव्य करतात. तेव्हा ते वक्तव्य निश्चितपणे निषेधार्थ आहे.