श्रीमलंग गडाची यात्रा सुरु, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गडावरील आरती
By मुरलीधर भवार | Published: February 2, 2023 08:15 PM2023-02-02T20:15:24+5:302023-02-02T20:17:31+5:30
यासंदर्भात माहिती देण्याकरीता कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निवासस्थानी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
कल्याण-कल्यानजीक असलेल्या श्रीमलंग गडाची यात्रा सुरु झाली आहे. या यात्रे निमित्त ५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडावर दर्शनासाठी जाणार असून गडावरील मच्छींद्रनाथांच्या समाधी मंदिरातील आरतीदेखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
यासंदर्भात माहिती देण्याकरीता कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निवासस्थानी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, आमदार भोईर, शहर प्रमुख रवी पाटील, दिनेश देशमुख, भाऊ चौधरी, प्रभूनाथ भोईर, जयवंत भोईर, मोहन उगले, राजेंद्र चौधरी, राजेंद्र भुल्लर, छाया वाघमारे, नेत्रा उगले आदी मान्यवर उपस्थित होते. १२ व्या शतकातील संत ज्ञानेश्वरांच्या कार्यकाळापासून श्रीमलंग मच्छींद्रनाथ यांची समाधीचे संदर्भ सापडतात. या समाधी मंदिरावर मुस्लीम धर्मियांनी अतिक्रमण केले आहे. त्यावर दावा सांगितला आहे. या प्रकरणी न्यायालयात दावा न्याय प्रविष्ट आहे. मलंग मुक्तीसाठी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांनी १९८६ सालापासून आंदोलन सुरु केले. हे आंदोलन आजतागायत सुरु आहे. या आंदोलनाचा वारसा एकनाथ शिंदे यांनी पुढे कायम राखला. त्यांच्याच समवेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे हजारो कार्यकर्ते गडावर ५ फेब्रुवारी कूच करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडावरील समाधी मंदिरात आरती केली जाणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी पालखी निघणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी गंध लेपन आणि गुलाबपानी दूधाने समाधीला न्हाऊ घातले जाणार आहे.