रजिस्ट्रेशन केलं, लघुशंकेचं कारण सांगितलं; ...अन् कोरोना लस न घेताच तरुणानं लसीकरण केंद्रावरून ठोकली धूम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 07:02 PM2021-12-23T19:02:11+5:302021-12-23T19:03:24+5:30

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर ओमायक्रॉन व्हेरीयंटाच्या भितीपोटी लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. तसेच अनेक ठिकाणी दोन डोस घेतलेल्या नागरीकांनाच प्रवेश दिला जात आहे. यामुळेच या तरुणाने रजिस्ट्रेशन करून लस न घेता पळ काढला आहे.

The young man escaped without taken corona vaccine from vaccination center in Dombivli | रजिस्ट्रेशन केलं, लघुशंकेचं कारण सांगितलं; ...अन् कोरोना लस न घेताच तरुणानं लसीकरण केंद्रावरून ठोकली धूम

सांकेतिक छायाचित्र

googlenewsNext

कल्याण - डोंबिवली पूर्व भागातील नेहरु मैदान परिसरात असलेल्या कल्याण डोंबिवली महापलिकेच्या कोरोना लसीकरण केंद्रावर आज एक २९ वर्षीय तरुण लस घेण्यासाठी गेला होता. त्याने लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनही केले. मात्र लस न घेताच त्याने पळ काढला. लसीकरणाविषयी काही जणांच्या मनात भिती आहे. ही बाब या घटनेतून समोर आली आहे.

लसीकरण केंद्राचे काम आज सकाळीच सुरु झाले. नेहरुनगर लसीकरण केंद्रावर ऋषीकेश मोरे हा २९ वर्षीय तरुण लसीकरणाच्या रांगेत उभा होता. तो त्याच्या आईसोबत गेला होता. त्याचा नंबर येताच लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्याचे आधारकार्ड घेऊन त्याचे लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केले. यानंतर त्याला लस घेण्यासाठी आत सोडले असता. त्याने नर्सला सांगितले की, त्याला लघुशंका आली आहे. नर्सने त्याला आधी लस घ्या, मग जा, असे सांगितले. रजिस्ट्रेशन करून तरुणाचा लस न घेण्याचा इरादा पाहून त्याला नर्सने धरुन ठेवले. त्या ठीकाणी सुरक्षा रक्षकाला त्याच्या सोबत जाण्यास सांगण्यात आले. त्याने त्याला नकार दिला. लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून ठेवून लस देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाताला झटका देत तरुणाने त्या ठिकाणाहून पळ काढला. हा त्याचा दुसरा डोस होता. त्याने पळ काढल्याने त्याने पहिला डोस तरी घेतला आहे की नाही, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थीत झाला आहे.

यासंदर्भात डॉ.अनुपमा साळवे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हा तरुण लस न घेता पळून गेला आहे. त्याचे नाव आमच्याकडे आहे. त्याचे रजिस्ट्रेशन झाले आहे. त्याने लस घेतली नसली तरी, त्याला ट्रेस करून त्याच्या घरी जाऊन महापालिकेचे पथक लस देणार आहे. यात लसीकरण केंद्राचा काही एक दोष नाही.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर ओमायक्रॉन व्हेरीयंटाच्या भितीपोटी लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. तसेच अनेक ठिकाणी दोन डोस घेतलेल्या नागरीकांनाच प्रवेश दिला जात आहे. यामुळेच या तरुणाने रजिस्ट्रेशन करून लस न घेता पळ काढला आहे. एक तर या तरुणाच्या मनात लसीकरणाविषयी भिती असावी अथवा त्याला केवळ रजिस्ट्रेशन हवे होते. जे सगळीकडे आवश्यक मानले जात आहे.
 

Web Title: The young man escaped without taken corona vaccine from vaccination center in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.