पुराच्या पाण्यात वाहून जात होता तरुण; कोळी बांधवांनी वाचवला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 03:18 PM2021-07-26T15:18:24+5:302021-07-26T15:20:02+5:30
- मयुरी चव्हण कल्याण : दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये टिटवाळ्यातील रिजेन्सी परिसरात राहणाऱ्या युवकाला पोहायला उतरण्याचे धाडस चांगलच ...
- मयुरी चव्हण
कल्याण: दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये टिटवाळ्यातील रिजेन्सी परिसरात राहणाऱ्या युवकाला पोहायला उतरण्याचे धाडस चांगलच अंगलट आलय. तब्बल अडीच तास पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर वाहत जाणाऱ्या या युवकाचा जीव अटाळी गावातील कोळी बांधवांनी वाचवला. होडीच्या मदतीन कोळी बांधवानी या तरुणाला सुरक्षित बाहेर काढलं. पूरस्थिती बघायला आणि नदी किंवा खाडीकिनाऱ्यावर पोहायला अनेक तरुण उत्सुक असतात. मात्र प्रत्येक वेळी दैव बलवत्तर असा साक्षात्कार येईलच अस नाही. त्यामुळे युवकांनो नको ते धाडस करू नका.
टिटवाळा रिजेन्सी परिसरात राहणारा युवक पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त होता की तो त्यासोबत वाहू लागला आणि थेट काळू नदीत पोहोचला. अशाप्रकारे हा युवक तब्बल अड्डीच तासानंतर अटाळी गावाजवळील काळू नदीपत्रात पोहोचला. याठिकाणी वाहून जात असताना अटाळी गावातील स्थानिक कोळी बांधव विवेक कोनकर आणि शैलेश पाटील यांच्या निदर्शनास आल. या दोघांनी त्याला आपल्या होडीच्या मदतीने पुराच्या पाण्यातुन बाहेर काढत जीवदान दिल. पाण्याबाहेर आल्यानंतर या तरुणाला बोलताही येत नव्हत. त्यामूळे कोळी बांधवांनी त्याला पोलिसांकडे सर्पुद केल
विशेष म्हणजे या कोळी बांधवाच घर पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडाले असतानाही या परिस्थितीत त्यांनी तरुणाचा जीव वाचवल्याने दोघांचेही सर्वत्र कौतुक होतय. तसेच ग्रामस्थ मंडळ अटाळी-कोळीवाडातर्फे या दोघाही तरुणांचा सत्कार करण्यात आला. या दिवसात अनेक दुर्घटना घडल्यात..पोहण्याच धाडस अनेक तरुणांना महागात पडलंय. त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका.