घरातून दूध आणायला गेलेला तरूण कसारा रेल्वे स्थानकात सापडला
By अनिकेत घमंडी | Published: February 2, 2023 05:08 PM2023-02-02T17:08:44+5:302023-02-02T17:10:02+5:30
कल्याणचा युवक गोंधळून तो गेला कसाऱ्याला
डोंबिवली: कल्याण पूर्व येथे राहणारे व पेशाने शिक्षक असलेले सुरज जाधव यांचा मोठा इंजिनियर मुलगा आकाश याला त्याच्या आईने बुधवारी सकाळी दूध आणायला गेला होता परंतू बराच वेळ झाला तरी तो घरी आला नाही म्हणून आकाशच्या आईने त्याच्या वडिलांना फोन करून सांगितले कि आकाश दूध आणायला गेला होता. बराच वेळ झाला तो अजून घरी आला नाही, तेव्हा त्याच्या वडिलांनी व आईने त्याला शोधण्यास सुरूवात केली परंतू आकाश कुठेच आढळला नाही. आकाश कल्याण येथून ट्रेनमध्ये बसून कसारा येऊन फलाट क्रमांक १ वर येऊन बसला होता.
त्यावेळी कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलचे जवान रविंद्र गोसावी यांचे आकाश याच्यावर लक्ष गेले त्यांनी ताबडतोब आकाश याची विचारपूस करण्यास सुरूवात केली त्यावेळी आकाश याने मी कल्याणला राहात असून मला काही समजले नाही मी कसारा येथे कसा आलो मग गोसावी यांनी त्याच्या घरच्यांबद्दल विचारणा करून त्याच्या कडून वडिलांचा मोबाईल नंबर घेतला व वडील सुरज जाधव यांना फोन करून तुमचा मुलगा आकाश कसारा येथे असून तो सुखरूप असल्याचे सांगितले.हे ऐकताच वडिल जाधव हे सायंकाळी ६.३० वाजता कसारा आर.पी.एफ थाने येथे आले आणि आपल्या मुलाला ताब्यात घेतले तसेच जाधव यांनी तुम्ही देवासारखे स्थानकात ऊभे होतात म्हणूनच माझा मुलगा मला परत मिळाला असे म्हणत गोसावी यांचे मनापासून आभार मानले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"