मुंब्र्यात केयुर सावला युवकाचा लोकलमधून पडून मृत्यू

By अनिकेत घमंडी | Published: June 7, 2024 10:27 AM2024-06-07T10:27:06+5:302024-06-07T10:28:00+5:30

अज्ञात लोकल गाडी तून प्रवास करताना दरवाज्यातून खाली पडून गंभीर जखमी झाला होता.

youth keyur savla died after falling from local in mumbra | मुंब्र्यात केयुर सावला युवकाचा लोकलमधून पडून मृत्यू

मुंब्र्यात केयुर सावला युवकाचा लोकलमधून पडून मृत्यू

डोंबिवली: दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून केयुर सावला (३७) रा. डोंबिवली या युवकाचा मृत्यू।झाल्याची घटना गुरुवारी घडल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. त्यावेळी लोहमार्ग पोलिसांना ऑन ड्युटी स्टेशनमास्तर यांनी अंनाउन्स करून कळविले की, एक अनोळखी इसम अंदाजे वय ३७वर्ष , ही दिवा ते मुंब्रा रे. स्टे.दरम्यान की. मी ४०/६३३ जवळ अज्ञात लोकल गाडी तून प्रवास करताना दरवाज्यातून खाली पडून गंभीर जखमी झाला होता.

त्यास पोलीस हवालदार जी एस घुगे यांना स्टेशन मास्तर ,दिवा यांचा लेखी मेमो दिला. त्यानुसार घुगे यांनी जखमी केयुर रमनिकलाल सावला, यास जीवदानी हॉ.येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित।केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी शुक्रवारी दिली.  त्यानंतर मृतदेह ठाणे सिविल हॉस्पिटल ठाणे येथे पीएम हेण्यासाठी पाठवण्यात आला होता, त्या कालावधीत त्याच्या वारसांना।कळवण्यात आले होते, ते आल्यावर ओळख पटवून मृतदेह त्यांच्या हवाली सोपवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे हद्दीत 130 जणांचा मृत्यू

लोकलमधून पडून तसेच रूळ ओलांडताना, अज्ञात लोकलच्या धडकेने आदी कारणामुळे जानेवारीपासून आत्तापर्यंत १३० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यात लोकलमधून पडून मृत्यू झालेल्यांची संख्या लक्षणीय असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: youth keyur savla died after falling from local in mumbra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.