शाहूवाडीतील ग्रामपंचायतींना १ कोटी १२ लाखांचा निधी
By admin | Published: October 13, 2015 11:34 PM2015-10-13T23:34:13+5:302015-10-13T23:43:46+5:30
जनसुविधा योजनेचा फायदा : सभापती पंडितराव नलवडेंची माहिती
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींना विविध विकासकामांसाठी शासनाकडून एक कोटी १२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती सभापती पंडितराव नलवडे यांनी दिली. तालुक्यातील सरूड, कडवे व विशाळगड ग्रामपंचायतींना शासनाच्या नागरी सुविधा योजनेतून ‘क’ वर्ग यात्रास्थळांचा विकास करण्यासाठी सरूड (सात लाख), कडवे (पाच लाख), विशाळगड (पाच लाख), आदी १७ लाखांचा निधी तीन गावांना प्राप्त झाला आहे. जनसुविधा योजनेतून १५ गावांतील ग्रामपंचायतींना ९५ लाखांचा निधी मिळाला आहे. यामध्ये यात्रा स्थळांचा विकास करणे, स्मशानशेड रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय, नवीन इमारत, आदी विकासकामे करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
ग्रामपंचायतीचे नाव कंसात निधी : पेरीड (१८ लाख), सोनवडे (२० लाख), सरूड (६ लाख), आंबार्डे (३ लाख ५० हजार), पळसवडे (३ लाख ५० हजार), करूगळे (३ लाख ५० हजार), सावे (१० लाख), रेठरे (३ लाख ५० हजार), गोगवे (४ लाख), शित्तुर तर्फ मलकापूर (४ लाख), बुरंबाळ (३ लाख), परखंदळे (५ लाख), कोकाणे (३ लाख ५० हजार), वाकोळी (३ लाख ५० हजार) असा मिळून १ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.