राजर्षी शाहू संस्थेला १ कोटी १९ लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:24 AM2021-04-09T04:24:30+5:302021-04-09T04:24:30+5:30
कुरुंदवाड : येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेने रिझर्व्ह बँकेचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत पारदर्शी आणि आदर्शवत कारभारामुळे ...
कुरुंदवाड : येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेने रिझर्व्ह बँकेचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत पारदर्शी आणि आदर्शवत कारभारामुळे संस्थेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात १ कोटी १९ लाख रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेने सतत अ ऑडिट वर्ग राखला असून, प्रलयकारी महापूर, कोरोना यासारख्या आपत्तीतही सभासदांना बारा टक्के लाभांश देत सहकारात आदर्शवत कारभार करीत आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील व संस्थेचे अध्यक्ष किरण आलासे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
पाटील म्हणाले, मार्च २०२० अखेर संस्थेने ६६ कोटी ७५ लाख ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. कर्ज वाटप ३६ कोटी ३५ लाख इतके आहे. कर्ज वसुली ९९ टक्के असून, संस्थेने ० टक्के एनपीएची परंपरा कायम राखली आहे. एकूण शेअर भांडवल १ कोटी ९६ लाख ७३ हजार इतके झाले आहे, तर एकूण स्वनिधी ५ कोटी २० लाख ९७ हजार आहे. सर्व शाखा संगणकीकृत असून, आर. टी. जी. एस, एन. एफ. टी. ही सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध केलेली आहे. तसेच कोअर बँकिंग प्रणाली सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे संस्थापक माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, माजी अध्यक्ष जिनगोंडा पाटील, उपाध्यक्षा सुषमा उपाध्ये, संचालक धनपाल कोथळी, आण्णासाहेब गुदले, राजाराम कदम, व्यवस्थापक संजय गजनावर यांच्यासह संचालक उपस्थित होते.