- गणेश नागरी पतसंस्थेला १ कोटी ३४ लाख नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:23 AM2021-04-15T04:23:14+5:302021-04-15T04:23:14+5:30
संस्थेने अल्पावधीतच गरुडभरारी घेऊन १ कोटी ३४ लाखांवर नफा मिळवीत कोल्हापूर जिल्ह्यात सहकारातील एक आदर्श पतसंस्था असा दबदबा निर्माण ...
संस्थेने अल्पावधीतच गरुडभरारी घेऊन १ कोटी ३४ लाखांवर नफा मिळवीत कोल्हापूर जिल्ह्यात सहकारातील एक आदर्श पतसंस्था असा दबदबा निर्माण केला आहे.
खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या आशीर्वादाने अवघ्या ३३ वर्षांत या संस्थेचा वटवृक्ष होऊन लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी या संस्थेचा मोलाचा हातभार लागला असल्याचे सभापती पोतदार यांनी सांगितले.
संस्थेकडे अहवाल सालात ठेवी ६१ कोटी ३१ लाख, कर्ज वितरण - ४४ कोटी ०१ लाख (पैकी सोनेतारण कर्ज - १८ कोटी ३१ लाख) केले आहे, तर गुंतवणूक - २४ कोटी ७५ लाखांची केली आहे. संस्थेला निव्वळ नफा -१ कोटी ३४ लाख ३८ हजार इतका झाला असून, मुरगूड परिसरातील संस्थांमध्ये सर्वाधिक आहे. संस्थेचा एकूण व्यवहार - ४४२ कोटी ६३ लाख असून, थकबाकी ०.३५ टक्के, तर ऑडिट वर्ग ‘अ’ (मार्च २०२०) मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेने यानिमित्त सभासदांना दिवाळी सणात भेट वस्तू देण्याचा संकल्पही केला आहे.
यावेळी सभापती एकनाथ पोतदार, उपसभापती श्रीमती मंगल यरनाळकर, संचालक उदय शहा, सुखदेव येरुडकर, आनंदा देवळे, मारुती पाटील, खाशाबा भोसले, प्रकाश हावळ, दत्तात्रय कांबळे, भारती कुडवे, कार्यकारी संचालक राहुल शिंदे यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता .
उदय शहा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर राहुल शिंदे यांनी आभार मानले.