अरे बापरे! पोलीस नाईकाने मागितली तब्बल १ कोटी रुपयांची लाच

By तानाजी पोवार | Published: August 6, 2022 12:15 PM2022-08-06T12:15:44+5:302022-08-06T12:37:00+5:30

पोलीस संशयित लाचखोर तिवडे याचा शोध घेत आहेत.

1 crore bribe demanded from the complainant to settle the farm land claim in kolhapur | अरे बापरे! पोलीस नाईकाने मागितली तब्बल १ कोटी रुपयांची लाच

अरे बापरे! पोलीस नाईकाने मागितली तब्बल १ कोटी रुपयांची लाच

googlenewsNext

तानाजी पोवार

कोल्हापूर: शेत जमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी तक्रारदाराकडे १ कोटी लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निलंबित अंगरक्षक पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे, (रा. कोरोची ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्याविरोधात शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पोलीस संशयित लाचखोर तिवडे याचा शोध घेत आहेत.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराचे शेत जमिनीबाबत महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे, खंडपीठ पुणे येथे दावा सुरु आहे. दाव्याचा निकाल प्रशासकीय सदस्य माजी जिल्हाधिकारी माने यांना सांगून तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्याचे सांगितले. त्यासाठी तुमच्या विरुध्द पार्टींने एक कोटी देण्याची तयारी दाखवली आहे त्याप्रमाणे तुम्ही देखील तयारी करा असे म्हणून लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलीस उपअधीक्षक आदीनाथ बुथवंत यांच्याकडे तक्रार दाखल केली.

यानंतर पथकाने लाचेच्या मागणीबाबत दि.२२ मार्च २०२२ रोजी पडताळणी केली. या पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलीस नाईक जॉन तिवडे याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: 1 crore bribe demanded from the complainant to settle the farm land claim in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.