गुडाळेश्वर पतसंस्थेला १ कोटी नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:24 AM2021-04-07T04:24:42+5:302021-04-07T04:24:42+5:30
जिल्ह्यात अग्रेसर म्हणून नावलौकिक असणारी गुडाळ येथील गुडाळेश्वर पतसंस्थेला आर्थिक वर्षात तब्बल एक कोटी पंधरा लाख रुपयांचा ढोबळ नफा ...
जिल्ह्यात अग्रेसर म्हणून नावलौकिक असणारी गुडाळ येथील गुडाळेश्वर पतसंस्थेला आर्थिक वर्षात तब्बल एक कोटी पंधरा लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष ए. डी. पाटील गुडाळकर व अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली. यावेळी सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याची घोषणा केली. यंदा तब्बल पन्नास कोटी ठेवी जमा झाल्या आहेत तर कर्जपुरवठा सत्तावीस कोटी झाला आहे.
सव्वीस कोटी ८० लाख रुपयांचे भाग भांडवल जमा झाले आहे दोनशे वीस कोटी रुपयांची उलाढाल झाली असून व्यवसाय ७५ कोटींचा झाला आहे. उपाध्यक्ष ईश्वर पाटील, अनंत तेली, सर्व संचालक, व्यवस्थापक डी. जी पाटील , शाखा व्यवस्थापक विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात आदर्श पतसंस्था
जिल्ह्यातील अनेक पतसंस्थांना चुकीच्या कारभाराने कुलूप लागली असताना अत्यंत विश्वासाने भोगावतीचे संचालक ए . डी पाटील गुडाळकर यांनी उभा केलेली ही पतसंस्था जिल्ह्यात आदर्शवत संस्था आहे मुख्य कार्यालयासह भोगावती येथे दुसरी शाखा सुरु झाली आहे भविष्यात जिल्ह्यात या पतसंस्थेचे जाळे उभा करण्याचा मानस ए .डी पाटील यांचा आहे.