कोल्हापूर जिल्ह्यातील २७५ विकास संस्था कर्जमाफीविनाच : ९० टक्के वसूल संस्था १ हजारांच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:48 AM2020-02-03T10:48:39+5:302020-02-03T10:51:51+5:30

राजाराम लोंढे कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील २७५ विकास संस्था ...

1 development institute in Kolhapur district without loan waiver | कोल्हापूर जिल्ह्यातील २७५ विकास संस्था कर्जमाफीविनाच : ९० टक्के वसूल संस्था १ हजारांच्या पुढे

कोल्हापूर जिल्ह्यातील २७५ विकास संस्था कर्जमाफीविनाच : ९० टक्के वसूल संस्था १ हजारांच्या पुढे

Next
ठळक मुद्दे१९० संस्थांची १०० टक्के कर्जवसुली

राजाराम लोंढे

कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील २७५ विकास संस्था वंचित राहिल्या आहेत. यातील १९० विकाससंस्थांनी १०० टक्के कर्जवसुली केली असून, त्यांच्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा दमडीचाही लाभ होणार नाही. संपूर्ण वसुली करणाºया १९० संस्था जरी दिसत असल्या तरी ९० टक्के वसुली करणाºया संस्थांची संख्या १ हजारापेक्षा अधिक आहे.

विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होण्याऐवजी विरोध झाला. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातून कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये कमालीची खदखद पहावयास मिळते. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करायचा झाल्यास १९०३ विकास संस्था कार्यरत असल्या तरी त्यातील १६२६ विकास संस्थांनाच कर्जमाफीचा लाभ झालेला आहे. उर्वरित २७५ संस्था लाभापासून वंचित राहणार आहेत. त्यातील १९० संस्थांनी कर्जवसुली १०० टक्के केली आहे.

राज्यातील विकास संस्थांच्या तुलनेत कोल्हापुरात विकास संस्था अधिक सक्षम आहेत. याला महत्त्वाचे कारण म्हणजे विकास संस्थांची १०० टक्के कर्जवसुली आहे. त्याचबरोबर ९० टक्के कर्जवसुली करणाºया संस्थांची संख्या १ हजारापेक्षा अधिक आहे. त्यामुळेच या कर्जमाफीचा सर्वांत कमी लाभ कोल्हापूर जिल्ह्याला होणार आहे.

सावर्डेच्या दोन संस्थांची तपासणी प्रलंबित
सावर्डे (ता. हातकणंगले) येथील दत्त विकास व शिवक्रांती विकास संस्थेत अपहार झाला आहे. त्यामुळे कर्जमाफीचे कामकाज प्रलंबित ठेवण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

‘नियमित’मध्ये राज्यात पुढे
राज्यात थकबाकीचे प्रमाण कमी असल्याने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा सर्वांत कमी लाभ कोल्हापूर जिल्ह्याला होणार आहे. मात्र, नियमित कर्जमाफीचा निर्णय झाला तर सर्वाधिक लाभ कोल्हापूरला होईल. थकबाकीच्या पडताळणीचे काम वेगाने झाले असले तरी ‘नियमित’ची पडताळणी करताना लेखापरीक्षण विभागाला घाम फुटणार आहे.

२६.४६ कोटी व्याजमाफीचा लाभ होणार
सप्टेंबर २०१९ अखेर १३६ कोटी ८३ लाख थकीत पीक कर्ज आहे. त्यावरील व्याज २६ कोटी ४६ लाख रुपये होते. त्यामुळे थकीत कर्ज आणि त्यावरील व्याज असे १६३ कोटी ३० लाख रुपये कर्जमाफीची यादी आहे.

तालुकानिहाय विकास संस्थांची थकीत रक्कम -

  • तालुका एकूण संस्था शेतकºयांची संख्या थकीत रक्कम १०० टक्के वसूल संस्था कर्ज वाटप नसलेल्या संस्था
  • आजरा १०८ १,७१५ ५.८४ कोटी १३ १
  • भुदरगड २०८ २,०९० ८.३८ कोटी १० ५
  • चंदगड १२९ ३,३१७ १८.८५ कोटी ०३ १
  • गडहिंग्लज १०७ २,५३२ १३.६५ कोटी १२ २
  • गगनबावडा ८० १,१०७ ९.१९ कोटी ११ ८
  • हातकणंगले १३६ २,७५२ १३.१९ कोटी २४ ४
  • कागल १७६ २,९९० १६.५५ कोटी १० ११
  • करवीर २५४ ३,७७४ १६.३७ कोटी ४९ ५
  • पन्हाळा २५० ३,८८२ १९.०९ कोटी १८ १५
  • राधानगरी २०४ ३,७८४ १५.१७ कोटी ०७ १७
  • शाहूवाडी ९९ ३,२९८ १८.२३ कोटी ०९ ०
  • शिरोळ १५२ १,३९३ ८.७३ कोटी २४ १५


एकूण १९०३ ३२,६३३ १६३.२४ कोटी १९० ८४

Web Title: 1 development institute in Kolhapur district without loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.