मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख ११ हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:49+5:302021-06-10T04:16:49+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनमान्य वजने-मापे उत्पादक, विक्रेते व दुरुस्तक परवानाधारकांच्या संघटनेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख ११ हजारांची ...

1 lakh 11 thousand assistance to the Chief Minister's Assistance Fund | मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख ११ हजारांची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख ११ हजारांची मदत

Next

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनमान्य वजने-मापे उत्पादक, विक्रेते व दुरुस्तक परवानाधारकांच्या संघटनेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ लाख ११ हजारांची मदत देण्यात आली. हा मदतीचा धनादेश अन्न, नागरी पुर‌वठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मुंबईतील ‘रामटेक’ बंगल्यावर सुपूर्द करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वजने-मापे परवानाधारकांचा व्यवसायसुद्धा अडचणीत सापडला आहे. मात्र, असे असले तरी परवानाधारकांच्या प्रलंबित व्यावसायिक आणि प्रशासकीय अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. अशा परिस्थितीत संघटनेने सामाजिक दायित्व पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख ११ हजार रुपये सभासदांनी स्वयंस्फूर्तीने जमवून दिले आहेत. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनोद कदम (कोल्हापूर) सचिव हेमंत अटाळकर (नागपूर), कोषाध्यक्ष सुनील जाधव (औरंगाबाद), अशपाक भाई, सुरेशदादा सपकाळ (पुणे), सहसचिव संतोष व्यवहारे, प्रहार जनशक्तीचे गौरव जाधव, आदी उपस्थित होते.

रियाज बागवान यांची निवड

कोल्हापूर : माहिती अधिकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी रियाज गुलाब बागवान यांची निवड झाली. ही निवड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कायदेशीर सल्लागार परवेज पठाण यांच्या शिफारसीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे व प्रदेशाध्यक्ष अमर बेंद्रे यांनी केली.

पदोन्नती पूर्ववत करा

कोल्हापूर : राज्य शासनाने शासकीय नोकरीतील ३३ टक्के मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांचा पदोन्नती कायदा पूर्वीप्रमाणे करावा, याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे महापालिका आयुक्त निखील मोरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता मिसाळ, प्रताप बाबर, संजय लोखंडे, सुखदेव बुध्याळकर, दत्ता लांडगे, बैजू कांबळे, प्रवीण निगवेकर, प्रवीण आजरेकर, आकाश जावळे, पांडुरंग जगताप, आदी उपस्थित होते.

Web Title: 1 lakh 11 thousand assistance to the Chief Minister's Assistance Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.