नववी, अकरावीचे १ लाख ११ हजार विद्यार्थी पुढील वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:25 AM2021-04-08T04:25:15+5:302021-04-08T04:25:15+5:30

शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकूण ४ लाख ६० हजार, तर कोल्हापूर शहरामधील १० हजार ४०० ...

1 lakh 11 thousand ninth, eleventh class students in the next class | नववी, अकरावीचे १ लाख ११ हजार विद्यार्थी पुढील वर्गात

नववी, अकरावीचे १ लाख ११ हजार विद्यार्थी पुढील वर्गात

googlenewsNext

शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकूण ४ लाख ६० हजार, तर कोल्हापूर शहरामधील १० हजार ४०० विद्यार्थी परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेशित झाले. नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबतही असा निर्णय घेण्याची मागणी झाली. त्यानुसार शासनाने नववी आणि अकरावीतील विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याबाबतचा निर्णय बुधवारी जाहीर केला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील नववीचे ६०२२६ आणि अकरावीचे ५१३५९ विद्यार्थी पुढील वर्गात जाणार आहेत. त्यात सर्वाधिक २४२९४ विद्यार्थी हे हातकणंगले तालुक्यातील आहेत. गेल्या वर्षी या दोन्ही इयत्तांची परीक्षा झाली होती. यावर्षी होणार नाही.

तालुकानिहाय विद्यार्थी संख्या

आजरा : २५०९

भुदरगड : ४०३३

चंदगड :५०५६

गडहिंग्लज : ७६१६

गगनबावडा : ९७७

हातकणंगले :२४२९४

कागल :९९०५

करवीर : १०२७४

पन्हाळा :८१३३

राधानगरी :४२९६

शाहूवाडी : ३९३८

शिरोळ : ९११३

चौकट

शहरात २१४४१ विद्यार्थी

पुढील वर्गात जाणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी २१४४१ विद्यार्थी हे कोल्हापूर शहरातील आहेत. त्यात ११६९१ मुले, तर ९७५० मुली आहेत.

प्रतिक्रिया

इयत्ता नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याबाबतच्या शासन निर्णयाची माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना कळविण्यात आली आहे.

-किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी.

Web Title: 1 lakh 11 thousand ninth, eleventh class students in the next class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.