सावर्डेच्या ‘दत्त विकास’मध्ये ८८ लाखांचा अपहार -: पन्हाळा तालुक्यातही एंट्री टाकून १० लाखांची उचल केल्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:42 AM2019-07-25T00:42:39+5:302019-07-25T00:44:58+5:30

कोल्हापूर : सावर्डे (ता. हातकणंगले) येथील दत्त विकास संस्थेत शेतकऱ्यांकडून जमा झालेल्या कर्जाची ८८ लाखांची रक्कम जिल्हा बॅँकेत जमा ...

1 lakh lashes in Seward's 'Dutt Vikas' | सावर्डेच्या ‘दत्त विकास’मध्ये ८८ लाखांचा अपहार -: पन्हाळा तालुक्यातही एंट्री टाकून १० लाखांची उचल केल्याचा प्रकार

सावर्डेच्या ‘दत्त विकास’मध्ये ८८ लाखांचा अपहार -: पन्हाळा तालुक्यातही एंट्री टाकून १० लाखांची उचल केल्याचा प्रकार

Next
ठळक मुद्देजिल्हा बॅँक निरीक्षक निलंबित

कोल्हापूर : सावर्डे (ता. हातकणंगले) येथील दत्त विकास संस्थेत शेतकऱ्यांकडून जमा झालेल्या कर्जाची ८८ लाखांची
रक्कम जिल्हा बॅँकेत जमा न केल्याचे  प्रकरण उघडकीस आले आहे. यामध्ये बॅँकेचे निरीक्षक व संस्थेच्या सचिवांना जबाबदार धरण्यात आले असून, निरीक्षक के. बी. पाटील यांना निलंबित केले आहे.
आतापर्यंत यातील १८ लाख ३६ हजार रुपये वसूल झाले आहेत. दीड महिन्यापूर्वी पन्हाळा शाखेंतर्गत निरीक्षक मुकेश पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नावावर आपणच पैसे उचल केले असून, त्यांच्याकडून १0 लाख रुपये वसूल केले आहेत. दत्त विकास संस्थेतून वर्षाला कोट्यवधी रुपयांचे पीक व मध्यम मुदत कर्जाचे वाटप केले जाते. पीक कर्ज शेतकºयांकडून वसूल करण्यात आले; पण ही रक्कम जिल्हा बॅँकेत भरलीच नाही. या शेतकºयांना पुन्हा कर्जपुरवठा करताना जिल्हा बॅँकेच्या निरीक्षकांनी रोखायला हवे होते.

चौकशीत ८८ लाखांची रक्कम अशी वाटप केल्याचे उघडकीस आले असून, या प्रकाराला निरीक्षक के. बी. पाटील यांना जबाबदार धरीत निलंबित केले आहे. आतापर्यंत ८८ लाखांपैकी केवळ १८ लाख ३६ हजार रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी बॅँकेने तगादा लावला आहे. पन्हाळा शाखेचे निरीक्षक मुकेश पाटील यांनीही शेतकºयांच्या नावावर एंट्री टाकून १0 लाखांची उचल केल्याचे उघडकीस आले आहे. पाटील यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.


‘दत्त’चे फेरलेखापरीक्षण होणार
जिल्हा बॅँकेने झालेल्या प्रकाराबद्दल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली आहे. उपनिबंधक कार्यालय संबंधित संस्थेचे फेरलेखापरीक्षण करणार आहेत. त्यानंतरच या प्रकरणात नेमके कोण कोण दोषी आहेत, याचा उलघडा होणार आहे.

कारवाई नसल्यानेच मुजोरी
मध्यंतरी पन्हाळा तालुक्यातील एका बड्या नेत्याशी संबंधित निरीक्षकाने अपहार केला होता. त्याला केवळ एक दिवस निलंबित करून पुन्हा कामावर घेतले. जिल्हा बॅँकेकडून कडक कारवाई होत नसल्यानेच कर्मचारी व अधिकाऱ्यांची मुजोरी वाढल्याची चर्चा बॅँकिंग वर्तुळात आहे.
 

दत्त-सावर्र्डे शाखेत ८८ लाखांचा अपहार असून, त्यास निरीक्षक के. बी. पाटील, तर शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर पैसे उचलणारे पन्हाळा शाखेचे निरीक्षक मुकेश पाटील यांना निलंबित केले आहे.
- डॉ. ए. बी. माने (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅँक)

Web Title: 1 lakh lashes in Seward's 'Dutt Vikas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.