विभागात ६० लाख टन ऊस उत्पादन घटणार : महापुराचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:07 PM2019-11-26T12:07:09+5:302019-11-26T12:08:26+5:30
यंदाच्या हंगामात ६० लाख ६१ हजार ९० टनांनी उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. सर्वाधिक फटका कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना बसणार आहे.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत जुलै-आॅगस्ट महिन्यांत आलेल्या महापुराने झालेले उसाचे नुकसान व उत्पादनात होणाऱ्या घटीचा अहवाल साखर विभागाने आयुक्तांकडे पाठविला आहे. महापुरात विभागात ७० हजार ९४६ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने यंदाच्या हंगामात ६० लाख ६१ हजार ९० टनांनी उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. सर्वाधिक फटका कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना बसणार आहे.
यंदाचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी महापुराचे सावट हंगामावर आहे. साखर विभागाने कारखानानिहाय पूरबाधित उसाची आकडेवारी संकलित केली असून, यामध्ये उसाच्या उत्पादनात मोठी घट होणार हे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर विभागातील सात लाख ३२ हजार ९५ हेक्टर पैकी ७० हजार ९४६ हेक्टर क्षेत्र हे पूरबाधित आहे. सर्वाधिक ५३ ंहजार ३५३ हेक्टर हे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील असून, १७ हजार ५९३ हेक्टर हे सांगली जिल्ह्यातील आहे. उसाच्या उत्पादनाच्या दृष्टीने पाहिले तर साहजिकच कोल्हापूरला ३५ लाख ९ हजार २४९ टनांचा फटका बसू शकतो.
‘क्रांती’ला सर्वाधिक फटका
क्रांती सहकारी साखर कारखाना, कुंडल या कारखान्याचे एकूण १२ हजार ७४६ हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल १९९४ हेक्टर पूरबाधित आहे. पूरबाधित क्षेत्र कमी असले तरी यातील ५० टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ हुपरी (ता. हातकणंगले) जवाहर कारखान्याचे २३ हजार ४९५ हेक्टरपैकी ११ हजार ५२५ हेक्टर क्षेत्र पूरबाधित आहे.
‘वारणा’, ‘ंमंडलिक’चे तुलनेने नुकसान कमी
विभागातील इतर कारखान्यांना पुराचा ज्या प्रमाणात फटका बसला, त्या प्रमाणात तात्यासाहेब कोरे वारणा व सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याला बसलेला अहवालात दिसत नाही. हातकणंगले व शिरोळमधील इतर कारखान्यांच्या तुलनेत ‘शरद’चे क्षेत्र कमी असून, त्यांना ५१ हजार टनांचा फटका बसेल.
कारखानानिहाय पूरबाधित क्षेत्र व घटणारे उत्पादन-
कारखाना एकूण क्षेत्र हेक्टर बाधित क्षेत्र ऊस उत्पादनात घटणार
भोगावती ९०९५ २,०६० १,८१,९००
राजाराम ६६४४ १,०१२ १,१९,५९२
शाहू १३,९३५ २,५८५ १,३९,३५०
दत्त-शिरोळ ११,८९२ ३,७३२ ३,६८,६५२
बिद्री ११,४०२ २,०४५ १,१४,०२०
नलवडे - हरळी ६,८४९ १,२२४ ४७,९४३
जवाहर २३,४९५ ११,५२५ ५,८७,३७५
कुंभी ९,८७० २,९५५ १,४८,०५०
पंचगंगा-इचलकरंजी १५,०४५ ५,५६० ३,७६,१२५
शरद-नरंदे ८,५५९ २,२२९ ५१,३५४
आजरा ७,५९० १,६०० ७५,९००
गायकवाड ४,००० ९११ ६०,०००
डी. वाय. पाटील ८,२०१ १,२३० ५७,४०७
गुरुदत्त-टाकळीवाडी ८,१८० १,६०९ १,६३,६००
इको केन-म्हाळुंगे ९,५६५ २,३९२ ९५,६५०
हेमरस - राजगोळी १२,१९९ १,८९० १,०९,७९१
महाडिक शुगर्स-फराळे ६,७६६ १,३५३ ३३,८३०
संताजी घोरपडे ११,५२५ २,३०० २,५३,०५०
दालमिया -आसुर्ले १७,९८४ ३,७०० २,६९,७६०
इंदिरा-तांबाळे ८,५३० १,३६० २,५५,९००
किसन अहिर-वाळवा ८,३०९ ९,४९ १,२४,६३५
राजारामबापू-साखराळे ११,७५४ २,९१४ १,७६,३१०
राजारामबापू-वाटेगाव ६,४५१ ६,८९ ८३,८६३
राजारामाबापू-कारंदवाडी ५,६६८ १,३२४ ९०,६८८
मोहनराव शिंदे ९,४४३ १,९४१ १,२२,७६९
विश्वासराव नाईक ९,३१८ १,८३८ १,३९,७७०
क्रांती-कुंडल १२,७४६ १,९९४ ६,३७,३००
सोनहिरा-वांगी १६,१७२ २,५६२ १,३६,४९१
वसंतदादा-सांगली १५,६२५ २,२३० १,०९,३७५
उदगिरी शुगर-खानापूर १२,३७७ १,१५१ २,४७,५४०