१) 'शिवराज'च्या २२ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:22 AM2021-03-18T04:22:39+5:302021-03-18T04:22:39+5:30
२) वडकशिवालेत आठ महिलांना विमा संरक्षण गडहिंग्लज : वडकशिवाले (ता. आजरा) येथील शांताराम पांडुरंग दिवटे प्रतिष्ठानतर्फे आठ महिलांना प्रत्येकी ...
२) वडकशिवालेत आठ महिलांना विमा संरक्षण
गडहिंग्लज : वडकशिवाले (ता. आजरा) येथील शांताराम पांडुरंग दिवटे प्रतिष्ठानतर्फे आठ महिलांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा मोफत अपघाती विमा उतरवून त्यांना बँक पासबुक काढून देण्यात आले. अध्यक्षस्थानी पांडुरंग कसलकर होते. महेश शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी सुनील दिवटे, विष्णू सावंत, अशोक लोखंडे, शिवाजी पाटील, माणिक दिवटे, अर्जुन पाटील, दत्तात्रय काळे, जोतिबा कांबळे, विश्वनाथ काळे, नितीन सावंत, आदी उपस्थित होते.
३) कोवाडमध्ये देसाई यांचा स्मृतिदिन
गडहिंग्लज : कोवाड (ता. चंदगड) येथील श्रीराम विद्यालयात किणी कर्यात शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष श्रीमान व्ही. पी. देसाई यांचा २२ वा स्मृतिदिन पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्य वाय. व्ही. कांबळे होते. यावेळी एम. बी. नाईक, सुनील हल्याळी, डी. आर. धर्माधिकारी, एस. पी. पाटील, अनंत भोगण, एस. एल. वांद्रे, एस. एन. हल्याळी, आदी उपस्थित होते.