कोल्हापूर: दामदुप्पटीच्या आमिषाने एकास १० लाखांचा गंडा, महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल

By भीमगोंड देसाई | Published: September 20, 2022 05:34 PM2022-09-20T17:34:22+5:302022-09-20T18:17:21+5:30

या भामट्यांकडून जिल्ह्यात आणखी काही लोकांची फसगत झाल्याची शक्यता

10 lakh fraud of one with the lure of extra money, A case has been registered against a woman in kolhapur | कोल्हापूर: दामदुप्पटीच्या आमिषाने एकास १० लाखांचा गंडा, महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर: दामदुप्पटीच्या आमिषाने एकास १० लाखांचा गंडा, महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

कोल्हापूर : एका बड्या कंपनीत गुंतवणूक केल्यास ४० ते ५० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेसह दोघा भामट्यांनी पन्हाळा तालुक्यातील केखले येथील एकाची १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. बाबासाहेब आनंदराव पाटील असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयित राहूल शर्मा आणि स्नेहा शर्मा यांच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, संशयीत स्नेहा आणि राहुल या दोघांनी वेगवेगळ्या फोन नंबरवरून मेसेज व फोन करून फिर्यादी बाबासाहेब पाटील यांना मार्केट कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पाटील यांनी २८ मे ते २६ जुलै, २०२२ या कालावधीत १० लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र त्यांना कोणताही लाभ मिळाला नाही.

आपली फसगत झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. वारंवार फोन करूनही परतावा मिळाला नाही. गुंतवलेल्या पैशाची मागणी केल्यानंतर उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. म्हणून पाटील यांनी सोमवारी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या भामट्यांकडून जिल्ह्यात आणखी काही लोकांची फसगत झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: 10 lakh fraud of one with the lure of extra money, A case has been registered against a woman in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.