कागलमधील १० शाळा ‘आयएसओ’च्या यादीत

By admin | Published: January 18, 2016 12:25 AM2016-01-18T00:25:19+5:302016-01-18T00:26:10+5:30

पंचायत समिती शिक्षण विभाग प्रयत्नशील : १०० हून अधिक शाळांत ज्ञानरचनावाद उपक्रम

10 schools in Kagal to be named 'ISO' | कागलमधील १० शाळा ‘आयएसओ’च्या यादीत

कागलमधील १० शाळा ‘आयएसओ’च्या यादीत

Next

रमेश वारके-- बोरवडे कागल तालुका शैक्षणिक, आर्थिक दृष्टीने समृद्ध व्हावा, यासाठी तालुक्याच्या शैक्षणिक जागृतीसाठी पंचायत समिती शिक्षण विभागाची विशेष धडपड सुरू आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १० शाळा आय.एस.ओ. मानांकन शैक्षणिक गुणवत्ता यादीत आहेत, तर जिल्हा परिषदेच्या १२२ शाळांपैकी १०० हून अधिक शाळांत ज्ञानरचनावाद उपक्रम सुरू आहे. कागलची ही शैक्षणिक धडपड सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या जीवनात सरस्वतीच्या विणेची झंकार पोहोचविणारी आहे. कागलचे गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत बोडरे व सर्व विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. शिक्षक शाळेसाठी व मुलांच्या ज्ञानासाठी ज्या सेवा देतो, त्या सेवेचे मूल्यमापन म्हणून आय.एस.ओ. मानांकन प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलेल. आय.एस.ओ. मानांकनामुळे शैक्षणिक विश्वासार्हता जोपासण्यास सहकार्य मिळणार असून, जादा वेळ न जाता गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. ज्ञानरचनावादामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळणार असून, कागल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार तालुक्यातील अनेक शिक्षक व शिक्षिकांनी ज्ञानरचनावाद उपक्रम समजावून घेण्यासाठी व तो आपल्या शाळेत राबविण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन ज्ञानरचनावाद संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.
आय.एस.ओ. मानांकनात केंद्र शाळा बिद्री, सोनाळी, फराकटेवाडी, केनवडे, गलगले, व्हन्नूर, अर्जुनवाडा, हमीदवाडा, कासारी, मळगे खुर्द या जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. सलग तीन वर्षे या शाळांचे मूल्यमापन होणार आहे.

जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढणार
आय.एस.ओ. मानांकनामुळे जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलून गुणवत्ता सुधारण्यास व विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत होईल. शाळात ज्ञानरचनावाद उपक्रम राबविला जात आहे. विद्यामंदिर दत्तनगर ही छोटी शाळा ज्ञानरचनावादाचा आदर्श नमुना सांगता येईल.

Web Title: 10 schools in Kagal to be named 'ISO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.