जिल्हा बँकेच्या अर्थसाहाय्यातून १०० खाटांचे हॉस्पिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:24 AM2021-05-24T04:24:19+5:302021-05-24T04:24:19+5:30
गडहिंग्लज : स्वराज्य मल्टी-स्पेशलिटी हॉस्पिटल हे गडहिंग्लज विभागासह सीमाभागातील रुग्णांसाठी सर्वोत्तम सेवा केंद्र बनावे, अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री तथा ...
गडहिंग्लज : स्वराज्य मल्टी-स्पेशलिटी हॉस्पिटल हे गडहिंग्लज विभागासह सीमाभागातील रुग्णांसाठी सर्वोत्तम सेवा केंद्र बनावे, अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अर्थसाहाय्यातून साकारलेल्या पहिल्या १०० खाटांच्या सुसज्ज मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कोरोना कक्ष लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, बहुजन समाजातील डॉ. अजित पाटोळे यांनी गडहिंग्लज परिसराची गरज ओळखून सुरू केलेला हा वैद्यकीय प्रकल्प कौतुकास्पद आहे. त्यांच्या जिद्दीला पाठबळ देण्यासाठीच जिल्हा बँकेने वैद्यकीय क्षेत्रात पहिल्यांदाच साडेचार कोटीचे अर्थसहाय्य केले आहे. डॉ. पाटोळे म्हणाले, सर्व वैद्यकीय सेवा एकाच छताखाली देण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे. जिल्हा बँकेच्या अर्थसाहाय्यामुळेच तो पूर्णत्वाला जात आहे.
यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, आदी उपस्थित होते.
-------------------------
* फोटो ओळी : गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावर सुरू झालेल्या स्वराज्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कोविड कक्षाचे लोकार्पण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर उपस्थित होते.
क्रमांक : २३०५२०२१-गड-१०