साखळी उपोषणाला १०० दिवस पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2017 11:18 PM2017-03-10T23:18:48+5:302017-03-10T23:18:48+5:30

सर्किट बेंच लढा : प्रधान सचिवांना पत्र

100 days full of chain fasting | साखळी उपोषणाला १०० दिवस पूर्ण

साखळी उपोषणाला १०० दिवस पूर्ण

Next

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सहा जिल्ह्यांचे सर्किट बेंच व्हावे, या मागणीसाठी न्यायसंकुल इमारतीजवळ सुरू असलेल्या साखळी उपोषणाला शुक्रवारी १०० दिवस पूर्ण झाले. दरम्यान, कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी जिल्ह्यातील शिवसेना-भाजप आमदारांनी महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिवांना पत्र दिले आहे. शासनाने यावर तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी या पत्राद्वारे या लोकप्रतिनिधींनी केली आहे.
एक डिसेंबर २०१६ पासून याप्रश्नी साखळी उपोषण सुरू आहे. सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनसह विविध संघटना, संस्थांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. शुक्रवारी दगडी चाळ रूम नंबर तीनमधील वकिलांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला. त्यामध्ये अ‍ॅड. अभिजित कापसे, अ‍ॅड. रणजित गावडे, अ‍ॅड. सचिन पाटील, अ‍ॅड. प्रशांत पाटील, अ‍ॅड. अरविंद मेहता, अ‍ॅड. मनीष देसाई, अ‍ॅड. वाय. आर. खोत, अ‍ॅड. मनोज पाटील, अ‍ॅड. नीलेश रणदिवे, अ‍ॅड. गुरुप्रसाद माळकर, अ‍ॅड. शरद पाटील, अ‍ॅड. निशांत वणकुद्रे, अ‍ॅड. आर. बी. मंडलिक, अ‍ॅड. सोमनाथ गुंजवटे, अ‍ॅड. विल्सन नाथन, अ‍ॅड. कुलदीप कोरगांवकर, अ‍ॅड. तेहजीज नदाफ, अ‍ॅड. शौकत गोरवाडे, अ‍ॅड. संदीप घाटगे, अ‍ॅड. उमेश माणगांवे, अ‍ॅड. के. डी. पवार, अ‍ॅड. भगवान पवार, अ‍ॅड. योजना पोळ, अ‍ॅड. युवराज जाधव, अ‍ॅड. प्रीतम सांबरे, अ‍ॅड. जावेद फुलवाले, अ‍ॅड. विक्रांत पाटील आदींचा सहभाग होता. आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उपोषणाची सांगता झाली.


लोकप्रतिनिधींचे पत्र...
कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, अशी मागणी जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील तर भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक तसेच आमदार राजन साळवी यांनी पत्राद्वारे केली आहे. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील सुमारे ६२ हजार खटले उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. याप्रश्नी वकील व नागरिकांमध्ये शासनाबद्दल चिडीची भावना आहे. त्यामुळे यावर शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, असे पत्रात म्हटले आहे.

Web Title: 100 days full of chain fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.