कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील  १९ साखर कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 04:13 PM2023-02-25T16:13:21+5:302023-02-25T16:13:43+5:30

राजाराम लोंढे  कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून आतापर्यंत ३४ कारखान्यांनी ...

100 percent FRP paid by 19 sugar mills in Kolhapur, Sangli district | कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील  १९ साखर कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी अदा

संग्रहीत छाया

googlenewsNext

राजाराम लोंढे 

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून आतापर्यंत ३४ कारखान्यांनी १ कोटी ७३ लाख ११ हजार ९९० टनाचे गाळप केले आहे. त्यापैकी १९ कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे संपूर्ण रक्कम दिली असून आठ कारखान्यांनी ८० टक्क्यापेक्षा अधिक रक्कम खात्यावर वर्ग केली आहे. गाळपात ‘कल्लाप्पाण्णा आवाडे ‘हुपरी तर उताऱ्यात ‘दालमिया’ व अथणी शुगर्स, तांबाळेने आघाडी घेतली आहे.

यंदा साखर कारखान्यांच्या हंगामाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच गती घेतली. विनाखंड हंगाम सुरू राहिल्याने गाळप वेगाने झाले. निम्या कारखान्यांचा हंगाम मार्चच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. उर्वरित कारखाने अजून किमान महिना सव्वा महिने चालतील, असा अंदाज असल्याने यंदा सव्वादोन कोटी टनापर्यंत विभागाचे गाळप जाण्याची शक्यता आहे.

साखरेचे दर स्थिर राहिल्याने यंदा बहुतांशी कारखान्यांनी शेतकऱ्यांना पंधरवड्याप्रमाणे उसाचे पैसे दिले आहेत. आतापर्यंत १९ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. ८० टक्क्यापेक्षा अधिक एफआरपी अदा करणारे ८ कारखाने आहेत. सर्वाधिक १२.९९ टक्के उतारा ‘दालमिया-आसुर्ले’, अथणी-तांभाळे कारखान्याचा आहे.

यंदा ‘वारणा’चा बोलबोला!

मागील दोन-तीन हंगाम वारणा साखर कारखान्याच्या दृष्टीने अडचणीचे गेले होते. मात्र त्यातून बाहेर पडत यंदा आतापर्यंत तब्बल ९ लाख २४ हजार ६०० टनाचे गाळप केलेच; त्याचबरोबर शेतकऱ्यांची १०० टक्के ‘एफआरपी’ दिल्याने कारखाना कार्यक्षेत्रात ‘वारणा’ कारखान्यांचा बोलबोला आहे.

यांनी दिली १०० टक्के एफआरपी :

जिल्हा  - कारखाने
कोल्हापूर -  ‘शाहू’, ‘दत्त-शिरोळ’, ‘आवाडे-हुपरी’, ‘शरद’, ‘वारणा’, ‘अथर्व-बांबवडे’, दालमिया, इकाे केन, अथणी-तांबाले, अथर्व-दौलत.
सांगली  -  राजारामबापू युनि-१, युनिट वाटेगाव, करंदवाडी, तिपेहल्ली-जत, सोनहिरा, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, दालमिया-कोकरूड, उदगिरी-खानापूर.

सर्वाधिक गाळप :

आवाडे : १३ लाख ९२ हजार ३३३ टन
वारणा : ९ लाख २४ हजार ६०० टन
दत्त, शिरोळ : ८ लाख १० हजार ८८९ टन.

Web Title: 100 percent FRP paid by 19 sugar mills in Kolhapur, Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.