आजऱ्यातील २० गावांची वीज वितरणकडून १०० टक्के वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:21 AM2021-04-12T04:21:44+5:302021-04-12T04:21:44+5:30

आजरा : आजरा तालुक्यातील २० गावांनी घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक विभागाची वीज वितरणची १०० टक्के वसुली केली आहे. चव्हाणवाडी ...

100 percent recovery from electricity distribution of 20 villages in Ajara | आजऱ्यातील २० गावांची वीज वितरणकडून १०० टक्के वसुली

आजऱ्यातील २० गावांची वीज वितरणकडून १०० टक्के वसुली

Next

आजरा : आजरा तालुक्यातील २० गावांनी घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक विभागाची वीज वितरणची १०० टक्के वसुली केली आहे. चव्हाणवाडी गावाने शेतीपंपाची १ लाख ७१ हजारांची थकबाकी भरून विभागात १०० टक्के वीज बिल भरण्याचा बहुमान मिळविला आहे. नोव्हेंबरअखेर आजरा तालुक्यातील ३ कोटी ९० लाखांच्या थकबाकीपैकी पाच महिन्यांत २ कोटी ६७ लाखांची वसुली वीज वितरण कंपनीने केली असून थकबाकी वसुलीत जिल्ह्यात आदर्श काम केले आहे.

तालुक्यातील औद्योगिक घरगुती व व्यावसायिक विभागातील १६११९ ग्राहकांकडे ३ कोटी ९० लाखांची थकबाकी होती. त्यातील ७०८२ ग्राहकांकडे १ कोटी २३ लाख बाकी आहे. ही थकबाकी वसुली करण्यासंदर्भात वायरमन, कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ३१ मार्चअखेर ७२७७ घरगुती ग्राहकांकडून ६८ लाख ७५ हजार, व्यावसायिक ग्राहकांकडून १५ लाख २४ हजार, तर १९७ औद्योगिक ग्राहकांकडून ८० लाख ९७ हजार रुपयांची थकबाकी येणे आहे. त्यामध्ये बीएसएनएलसह विविध कंपन्यांच्या टॉवरकडून ४० लाख ७३ हजारांची थकबाकी येणे आहे.

घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक बाबतीत १०० टक्के थकबाकी वसुली केलेली आजरा तालुक्यातील २० गावे असून त्यांचा वीज वितरणकडून योग्यप्रकारे सन्मान केला जाणार आहे.

आरदाळ, बेलेवाडी, चव्हाणवाडी, चिमणे,‌ दर्डेवाडी, धामणे,‌ घाटकरवाडी,‌ हांदेवाडी, होन्याळी, कागीनवाडी, करपेवाडी, माद्याळ, महागोंड, महागोंडवाडी, मेढेवाडी, पेंढारवाडी, वडकशिवाले, वझरे व झुलपेवाडी या वीस गावांचा शंभर टक्के थकबाकी भरण्यामध्ये समावेश आहे. घरगुती थकबाकीदार ग्राहकांची संख्या जास्त असली तरी त्यामधील बहुतांशी ग्राहक हे चाकरमानी असून ते गावी आल्यानंतर प्रत्येक वर्षी मे महिन्यात वीज वितरणची थकबाकी भरत असतात. शिल्लक थकबाकी वसुली करण्यासाठी वीज वितरणचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: 100 percent recovery from electricity distribution of 20 villages in Ajara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.