महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी १०० सेवक रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 08:24 PM2018-02-02T20:24:14+5:302018-02-02T20:25:00+5:30

बाहुबली : श्रवनबेळगोळ (कर्नाटक) येथील भगवान बाहुबली महामास्तकाभिषेक सोहळ्यासाठी दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दलाचे सेवक सेवा योग देण्यासाठी जाणार आहेत.

100 servants leave for Mahamastak Kebhisak ceremony | महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी १०० सेवक रवाना

महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी १०० सेवक रवाना

Next

बाहुबली : श्रवनबेळगोळ (कर्नाटक) येथील भगवान बाहुबली महामास्तकाभिषेक सोहळ्यासाठी दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दलाचे सेवक सेवा योग देण्यासाठी जाणार आहेत. त्यातील १०० सेवकांची पहिली टीम श्रवनबेळगोळ कडे रवाना झाली. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष व महामास्तकाभिषेक समितीचे राष्ट्रीय सदस्य रावसाहेब पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा.डी ए पाटील, वीर सेवा दलाचे अध्यक्ष अरविंद मजलेकर यांची मुख्य उपस्थिती होती.

जैन बांधवांचे आराध्य स्थान असलेल्या गोमटेश भगवान बाहुबली यांचा महामास्तकाभिषेक समारंभ दि ६ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान सम्पन्न होत आहे. ५७ फुटाच्या विशालकाय मूतीर्चा मस्तकाभिषेक १२ वर्षांनी संपन्न होत असतो. त्यासाठी वीर सेवा दलाचे ५०० स्वयंसेवक व महिला मंडळाच्या २०० स्वयंसेविका जाणार आहेत. त्यापैकी १०० स्वयंसेवकांची टीम श्रवनबेळगोळ कडे रवाना झाली. यानंतर ३, ४ व १३ फेब्रुवारी रोजी बाकी स्वयंसेवक जाणार आहेत.

यावेळी भूपाल गिरमल,संयोजक अजित भंडे,नेमगोंडा पाटील,अभय कोले,बाबासो वठारे,बंडू अण्णा सूर्यवंशी,बाबा हुपरे,अनिल भोकरे यांच्या सह वीर सेवा दलाचे पदाधिकारी श्रावक श्राविका उपस्थित होते.
फोटो ओळ-श्रावणबेळगोळ (कर्नाटक) येथे होणाºया महामास्तकाभिषेक सोहळ्यासाठी वीर सेवा दलाचे स्वयंसेवक रवाना झाले त्यावेळी उपस्थित दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष व महामास्तकाभिषेक समितीचे राष्ट्रीय सदस्य रावसाहेब पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा.डी ए पाटील, वीर सेवा दलाचे अध्यक्ष अरविंद मजलेकर यांच्या सह वीर सेवा दलाचे पदाधिकारी व श्रावक श्राविका
 

 

Web Title: 100 servants leave for Mahamastak Kebhisak ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.