७६ गावांमधील ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:19 AM2021-05-28T04:19:33+5:302021-05-28T04:19:33+5:30
कोल्हापूर : लस अपुरी असतानाही योग्य नियोजन करत आणि प्राधान्यक्रम ठरवत जिल्ह्यातील ७६ ...
कोल्हापूर : लस अपुरी असतानाही योग्य नियोजन करत आणि प्राधान्यक्रम ठरवत जिल्ह्यातील ७६ गावांमधील ४५ वयावरील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक कामगिरीच्या जोरावर या नागरिकांना एक प्रकारचा दिलासाच दिला आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, नंतर फ्रंटलाईन वर्कर अशांना लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, नंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर लसीचा पुरवठाच खंडित होऊ लागल्याने अडचणी निर्माण झाल्या. तरीही आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस वाया न घालवता अधिकाधिक नागरिकांना ती कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आणि लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. फारूक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी या ७६ गावांमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करून घेतले आहे.
चौकट
१०० टक्के लसीककरण झालेली गावे
१ आजरा : पेंढारवाडी, चिमणे, करपेवाडी, धामणे, चव्हाणवाडी, वडकशिवाले
२ चंदगड : अडकूर, उत्साळी, मुगळी, इब्राहिमपूर, बुझवडे,
पोरेवाडी, हालगोळी, केरवडे, बाळकोळी, केरवडे, बाळकोळी, इनाम सावर्डे, पिळणी,
कानूर खुर्द, बिजूर, म्हाळुंगे, सडेगुडवळे, उमगाव, न्हावेली, अडकूर, झांबरे, भोगोली, किटवाड, नरगडे, किणी, मलतवाडी, सुपे
३. गगनबावडा : माग्रेवाडी, मांडुकली, साळवण, सांगशी
४.हातकणंगले : नवे पारगाव, कासारवाडी,
५. कागल : लिंगनूर, कापशी, बोळावीवाडी
६.पन्हाळा : बाजार भोगाव, पोहाळे तर्फ बोरगाव, पोर्ले तर्फ बोरगाव
७. राधानगरी : पालबुद्रुक, कुरणीवाडी, कुदळवाडी, धरमलेवाडी
८. शाहूवाडी : माणगाव, हावडे, खेडे, विरळे, तोंडोळी, शित्तूर वारूण, शिराळे वारूण, सावे, आकुळे, कोतोली, भेडसगाव, माणगाव, तुरूकवाडी, येळावे, सरूड, शिंपे, कापशी, थेरगाव, वडगाव
चार तालुके निरंक
जिल्ह्यातील करवीर, शिरोळ, भुदरगड आणि गडहिंग्लज या तालुक्यातील एकही गांव अजून शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. याउलट चंदगड व शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम गावांचे लसीकरण झाले आहे.