शिंदेवाडीत ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:24 AM2021-05-26T04:24:21+5:302021-05-26T04:24:21+5:30
कोपार्डे : शिंदेवाडी (ता. करवीर) येथे ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्यात ग्रामपंचायतीला यश आले. ४५ वर्षांवरील नागरिकांचे ...
कोपार्डे : शिंदेवाडी (ता. करवीर) येथे ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्यात ग्रामपंचायतीला यश आले. ४५ वर्षांवरील नागरिकांचे पूर्णपणे लसीकरण करणारे शिंदेवाडी हे जिल्ह्यातील पहिले गाव असल्याची माहिती सरपंच रंजना पाटील यांनी दिली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत शिंदेवाडी गाव हॉटस्पॉट बनले होते. शाळकरी मुलांना कोरोनाची लागण झाल्याने गाव चिंतेत होते. दुसऱ्या लाटेतही रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी ग्रामपंचायत पातळीवर लसीकरणाला गती देण्याचा निर्णय सरपंच रंजना पाटील यांनी घेतला. खुपिरे ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून गावातील ४५ वर्षावरील नागरिकांची यादी तयार करण्यात आली. त्यानुसार साडेपाचशेच्यावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
फोटो
: २५ शिंदेवाडी लसीकरण
शिंदेवाडीत ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात आली आहे.