कोरोनामुळे १०६ जणांचा मृत्यू, दिवसभरात नव्याने १०९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:02 PM2020-08-18T12:02:02+5:302020-08-18T12:03:23+5:30

कोल्हापूर शहरांमध्ये सोमवारी दिवसभरात कोरोनामुळे आणखीन चौघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १०६ जणांचा या आजारामुळे बळी गेला आहे. दिवसभरात नव्याने १०९ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

106 deaths due to corona, 109 new positive during the day | कोरोनामुळे १०६ जणांचा मृत्यू, दिवसभरात नव्याने १०९ पॉझिटिव्ह

कोरोनामुळे १०६ जणांचा मृत्यू, दिवसभरात नव्याने १०९ पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्दे कोरोनामुळे १०६ जणांचा मृत्यू, शहरातील ४ चार जणांचा समावेश दिवसभरात नव्याने १०९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

कोल्हापूर : शहरांमध्ये सोमवारी दिवसभरात कोरोनामुळे आणखीन चौघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १०६ जणांचा या आजारामुळे बळी गेला आहे. दिवसभरात नव्याने १०९ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

शहरातील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत ४७०० च्यावर कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे तर या आजाराने १०६ जणांचा बळी घेतला आहे. ऑगस्टमध्ये सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे. सोमवार दिवसभरात नव्याने १०९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

यामध्ये शिवाजी पेठ सर्वाधिक १४, मंगळवार पेठ ७,संभाजीनगर ४, कदमवाडी ६, ताराबाई पार्क ५, नागाळा पार्क ४, देवकर पाणंद ६, प्रतिभानगर ५ असा समावेश आहे.

आणखीन चौघांचा मृत्यू

शहरामध्ये दिवसभरात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये रविवार पेठ ५२ वर्षीय महिला, शुक्रवार पेठ ७६ वर्षाचा पुरुष, नागाळा पार्कमध्ये ६४ वर्षाचा पुरुष,वर्षानगरमध्ये ६९ वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे

हॉटस्पॉटमधील रुग्ण

राजारामपुरी ३५६, शिवाजी पेठ २६७, कसबा बावडा २२४, मंगळवार पेठ २२९,शाहूपुरी १४३, संभाजीनगर १४३, जवाहरनगर ११७, कदमवाडी ११३
 

  • एकूण परिसर सील २२९
  • सील काढलेले परिसर ९८
  • सध्या सील असणारे परिसर १३१

Web Title: 106 deaths due to corona, 109 new positive during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.