इराणी खणीत १०८३ गणेशमूर्तीचे विसर्जन; लहान ते २१ फूट गणेशमूर्तींचा समावेश
By सचिन भोसले | Published: September 10, 2022 05:57 PM2022-09-10T17:57:30+5:302022-09-10T17:58:28+5:30
इराणी खणीत शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून विर्सजनास हनुमान विकास मंडळाच्या गणेश विसर्जनाने झाली.
कोल्हापूर : उपनगरासह शहरातील २१ फुटी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावपरिसरातील इराणी खण व त्या शेजारील दुसऱ्या खणीत शुक्रवारी (दि.०९) पासून शनिवारी दुपारपर्यंत १०८३ हून अधिक लहान मोठ्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. हे विसर्जन पाहण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली होती.
इराणी खणीत शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून विर्सजनास हनुमान विकास मंडळाच्या गणेश विसर्जनाने झाली. त्यानंतर शिवसृष्टी मंडळ, वटवृक्ष काॅलनी, ब्लड ग्रुप, नापस्टार तरूण मंडळ, अमर तरूण मंडळ, कात्यायानी काॅम्प्लेक्स, जय शिवराय तरूण मंडळ, स्वयंभू गणेश मंडळ, जोतीबा रोड फुलवाले मित्र मंडळ, शिवालय तरूण मंडळ, विवेकानंद मित्र मंडळ, डी बाॅईज मित्र मंडळ, मनिषानगर मित्र मंडळ, फ्रेंडस मित्र मंडळ, शिवराज मंडळ, पटेल मित्र मंडळ , फायटर ग्रुप यांचा पहिल्या टप्प्यात विसर्जन झाले. त्यानंतर पर्यायी मार्गाने गणेश विसर्जनास सुरुवात झाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत २१ गणेशांचे विसर्जन झाले. त्यानंतर पर्यायी मार्गावरून येणाऱ्या गणेशांचा मोठा ओघ सुरु झाला. तत्पुर्वी सतेज पाटील फौंडेशन व माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्यामार्फत मानाचे श्रीफळ देण्यात आले.
पंधरा ते २१ फुटी गणेशमूर्तीचेही विसर्जन
पुलगल्ली तालीम मंडळ, स्वयंभू गणेश मंदीर, डाव ग्रुप, सोल्जर ग्रुप, सिद्धीविनायक लोहार समाज, बजाप माजगांवकर तालीम मंडळ, सम्राट चौक तरूण मंडळ, वाय.पी.पोवारनगर मित्र मंडळ,संयुक्त शिवाजी चौकचा राजा आदी मंडळांचा समावेश आहे.
या प्रमुख मंडळाचेही गणेश विसर्जन
महालक्ष्मी भक्त मंडळ, सेनापती बापट तरूण मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ, शाहू विजयी गंगावेश, नाथागोळे तालीम मंडळ, अवचितपीर तालीम मंडळ, सरदार तालीम मंडळ, गुजरी मित्र मंडळ, मदनलाल धिंग्रा तरूण मंडळ, न्यू संभाजीनगर फुटबाॅल क्लब, प्रतापसिंह तरूण मंडळ, जयशिवराय तरूण मंडळ, साठमारी तरूण मंडळ, शहाजी तरूण मंडळ, सुबराव गवळी तालीम मंडळ, लेटेस्ट तरूण मंडळ आदी मंडळांचा समावेश होता.
पर्यायी मार्गाचा अवलंब
शहरातील काही ठराविक मंडळे सोडली तर बहुतांशी मंडळांनी हॉकी स्टेडियम, संभाजीनगर ते देवकर पाणंद या
पर्यायी मार्गाचा अवलंब करीत ढोलताशे, डीजे साऊंडच्या गजरात आपले गणपती विसर्जित केले.
बत्तीस टन निर्माल्य जमा
गेली दोन दिवसात इराणी खान परिसरात सार्वजनिक मंडळांचे ३२ टन निर्मल्य जमा झाले.