कोल्हापुरात दहावीच्या परीक्षेस प्रारंभ; कोल्हापूर विभागात दीड लाख परीक्षार्थी
By admin | Published: March 7, 2017 11:59 AM2017-03-07T11:59:05+5:302017-03-07T11:59:05+5:30
विभागातील ३५१ केंद्रांवरून एक लाख ५२ हजार ६४२ परीक्षार्थी
कोल्हापुरात दहावीच्या परीक्षेस प्रारंभ; कोल्हापूर विभागात दीड लाख परीक्षार्थी
कोल्हापूर : कोल्हापुरात दहावीच्या परीक्षेस मंगळवारी प्रारंभ झाला.परीक्षा केंद्रावर विद्याथीं-विद्यार्थिंनींंसह पालकांनी शाळेच्या आवारात गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी पालकांचे आशिर्वाद घेतले, तर पालकांनी विद्यार्थ्यांना बेस्ट आॅफ लक म्हणत शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर विभागातील ३५१ केंद्रांवरून एक लाख ५२ हजार ६४२ परीक्षार्थी मंगळवारी दहावीच्या परीक्षेस बसले आहेत. सकाळी अकरा वाजता मराठीच्या पेपरने या परीक्षेस प्रारंभ झाला. गैरप्रकार रोखण्यासाठी यावर्षी २१ भरारी पथकांसह बैठी पथके कार्यरत आहेत. ही माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सहायक सचिव बी. एस. शेटे यांनी दिली.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेची कोल्हापूर विभागीय मंडळाने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून एकूण एक लाख ५२ हजार ६४२ विद्यार्थी-विद्यार्थिनी दहावीची परीक्षा देणार आहेत. यामध्ये एक लाख ४७ हजार २१२ नियमित, तर चार हजार २२० पुनर्परीक्षार्थी आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे २१० परीक्षार्थी आहेत. विभागातील ३५१ केंद्रांवर परीक्षा होत आहे. परीक्षा दि. १ एप्रिलपर्यंत होणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी विभागात २१ भरारी पथके तसेच ४४ परीरक्षक (कस्टोडियन) कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)
...................................................................................
कोल्हापुरात दहावीच्या परीक्षेस मंगळवारी प्रारंभ झाला. येथील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथील केंद्रावर विद्याथीं-विद्यार्थिंनींंसह पालकांनी शाळेच्या आवारात गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी पालकांचे आशिर्वाद घेतले, तर पालकांनी विद्यार्थ्यांना बेस्ट आॅफ लक म्हणत शुभेच्छा दिल्या.
छाया : नसीर अत्तार