कोल्हापूरकरांचा नादखुळा!, परीक्षा होताच दहावीच्या विद्यार्थ्यांची रंगपंचमी
By संदीप आडनाईक | Published: March 25, 2023 06:30 PM2023-03-25T18:30:44+5:302023-03-25T18:33:27+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरकरांचा नादखुळा आज, शनिवारी रस्त्यावर दिसून आला. परीक्षा होताच दहावीच्या विद्यार्थ्यांनी रंगपंचमी साजरी करत एकच जल्लोष केला. ...
कोल्हापूर : कोल्हापूरकरांचा नादखुळा आज, शनिवारी रस्त्यावर दिसून आला. परीक्षा होताच दहावीच्या विद्यार्थ्यांनी रंगपंचमी साजरी करत एकच जल्लोष केला. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेरच गुलाल आणि रंग उधळले. यात विद्यार्थिनीही मागे नव्हत्या.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे २ मार्च रोजी सुरु झालेल्या बोर्डाच्या दहावीची परीक्षा आज, शनिवारी, २५ मार्च रोजी संपली. कोल्हापूर जिल्ह्यातून १३६ केंद्रातून ५३ हजार ६७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जिल्ह्यात १७ परीरक्षक केंद्र होती तर पाच भरारी पथके लक्ष ठेवून असल्यामुळे यंदा परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार झाला नाही.
विद्यार्थिनींही नव्हत्या मागे
शनिवारी अकरा वाजता सुरु झालेला भुगोलाचा शेवटचा दहावीचा पेपर दुपारी २ वाजून दहा मिनिटांनी संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या बाहेर येवून जल्लोष केला. काही विद्यार्थ्यांनी आणलेले रंग एकमेकांच्या अंगावर फेकून आनंद व्यक्त केला. यात विद्यार्थिनींही मागे नव्हत्या. त्यांनीही एकेमेकींच्या चेहऱ्यांना रंग लावून रंगपंचमीच साजरी केली.