चंदगड मतदारसंघासाठी ११ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:15 AM2021-07-22T04:15:38+5:302021-07-22T04:15:38+5:30
गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील विविध विकासकामांसाठी २ वर्षांत ११ कोटींचा निधी मंजूर झाला ...
गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील विविध विकासकामांसाठी २ वर्षांत ११ कोटींचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार राजेश पाटील यांनी दिली.
यामध्ये प्रामुख्याने प्रकल्प व बंधाऱ्याची दुरुस्ती, सांडवा कालवा अस्तरीकरण, पोहच रस्ता आणि ड्रोन सर्व्हे आदी जलसंधारणाच्या कामांचा त्यात समावेश आहे.
पाटील म्हणाले, दळणवळण, शेती व पिण्याच्या पाण्यासाठी गडहिंग्लज विभागात अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. परंतु, दगडी बांधकामामुळे अनेक बंधाऱ्यांना गळती लागली आहे. अशा बंधाऱ्यांची दुरुस्ती या निधीतून करण्यात येणार आहे.
११ कोटींतून फाटकवाडी, जंगमहट्टी या मध्यम प्रकल्पांसह मतदारसंघातील २१ लघुपाटबंधारे तलावांसह चित्री व झांबर प्रकल्पाच्या चौक्यांची दुरुस्तीदेखील करण्यात येणार आहे.
उमगावा, न्हावेली, कुर्तनवाडी, माणगाव, चंदगड, कोकरे या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी तर जरळी, निलजी, गजरगाव व खणदाळसाठी १ कोटी मिळाले आहेत.
लक्कीकटे, आंबेवाडी, किटवाड, शेंद्री, वैरागवाडी, येणेचंवडी, तेरणी, कुमरी, एरंडोळ, सिरसंगी, खडकहोळ, जेलुगडे, कळसगादे, पाटणे या तलावासाठी पावणेपाच कोटींचा निधी मिळाला आहे.
घटप्रभा जंगमहट्टी व झांबरे या प्रकल्पांच्या लाभक्षेत्राच्या ड्रोन सर्व्हेक्षणासाठी ९० लाख मिळाले आहेत. याकामी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे सहकार्य लाभले, असेही आमदार पाटील यांनी आवर्जून सांगितले.
-------------------------
-
राजेश पाटील : २१०७२०२१-गड-०१