धारवाडजवळ भीषण अपघातात ११ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:29 AM2021-01-16T04:29:19+5:302021-01-16T04:29:19+5:30

बेळगाव : गोवा येथे मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी दावणगिरी येथून निघालेल्या मिनी बसला टिप्परने दिलेल्या जोराच्या धडकेने भीषण अपघात ...

11 killed in road mishap near Dharwad | धारवाडजवळ भीषण अपघातात ११ ठार

धारवाडजवळ भीषण अपघातात ११ ठार

Next

बेळगाव : गोवा येथे मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी दावणगिरी येथून निघालेल्या मिनी बसला टिप्परने दिलेल्या जोराच्या धडकेने भीषण अपघात झाला असून, या अपघातात दहा महिलांसह ११ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास धारवाड तालुक्यातील ईट्टगट्टी गावाजवळ असलेल्या बायपासवर घडला आहे. मृतांमध्ये दहा महिलांचा समावेश आहे. दावणगिरीहून गोव्याला जाणारी मिनी बस आणि बेळगावहून हुबळीकडे जाणारा टिप्पर यांच्यात हा अपघात झाला असून, बसमधील काहींची प्रकृती गंभीर आहे, तर टिप्परमधील एकाचा मृत्यू झाला आहे.

दावणगिरी येथील एका क्लबच्या एकूण १७ महिला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी गोव्याच्या दौर्‍यावर निघाल्या होत्या. या भीषण अपघातात या महिलांवरच काळाने घाला घातला आहे. या अपघातात टिप्परने दिलेल्या मिनी बसच्या धडकेत मिनी बसचा चक्काचूर झाला असून, दहा जणींचा जागीच मृत्यू झाला आहे. वर्षिता विरेश (वय ४५) मंजुळा नटेश (वय ४७), राजेश्वरी शिवकुमार (वय ४०), वीणा प्रकाश (वय ४७) मल्लिकार्जुन तिमप्पा (वय २१), हेमलता (वय ४०), परम ज्योती (वय ४७), राजू सोमाप्पा (वय ३८), क्षीरा सुरेश (वय ४७), प्रीती राजकुमार (वय ४६) आणि यशमित (वय २०) अशी मृतांची नावे आहेत. मिनीबसला लागलेली धडक आणि त्यानंतर बसचा झालेला चेंदामेंदा यामधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी उशीर झाला.

घटनास्थळी धारवाड ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. अपघातातील इतर जखमींना किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धारवाड ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक महेंद्रकुमार यांच्या उपस्थितीत मिनीबसमध्ये अडकलेले दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर ५ महिलांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. जखमींवर हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे.

Web Title: 11 killed in road mishap near Dharwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.