राजेंद्रनगरातील संयुक्त छत्रपती चौक मंडळातर्फे स्मशानभूमीस ११ हजार शेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:23 AM2021-05-14T04:23:43+5:302021-05-14T04:23:43+5:30
कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील संयुक्त छत्रपती चौक मंडळाच्यावतीने महानगरपालिकेच्या स्मशानभूमीस अकरा हजार शेणी दिल्या. या शेणींचा उपशहर अभियंता ...
कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील संयुक्त छत्रपती चौक मंडळाच्यावतीने महानगरपालिकेच्या स्मशानभूमीस अकरा हजार शेणी दिल्या. या शेणींचा उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांनी स्वीकार केला; तर माजी नगरसेवक सुनील मोदी यांच्याकडून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना ३२५ पीपीई कीट देण्यात आले. हे साहित्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी स्वीकार केला.
महानगरपालिकेच्या पंचगंगा, बापट कॅम्प, कसबा बावडा, कदमवाडी स्मशानभूमी येथे मृतदेहांवर मोफत अंत्यविधी करण्यात येतो. कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. अंत्यविधीसाठी शेणी व लाकूड भविष्यात कमी पडू नये म्हणून महापालिकेच्या स्मशानभूमीस शेणी दान करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते.
या आवहानास प्रतिसाद देऊन राजेंद्रनगर येथील संयुक्त छत्रपती चौक मंडळाच्यावतीने अकरा हजार शेणी उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांच्याकडे दिल्या. यावेळी आरोग्य निरीक्षक सुशांत कावडे, समन्वय अधिकारी तानाजी गेजगे, प्रभाग सचिव निश्चिल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सम्रागसिंह निकम, माजी नगरसेवक महेश वासुदेव, निवास बाचुळकर व संयुक्त छत्रपती चौक मंडळाचे कार्येकर्ते उपस्थित होते.