पेठवडगावात १११ रक्तदात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:21 AM2021-04-19T04:21:38+5:302021-04-19T04:21:38+5:30
येथील देवांग कोष्टी समाजाच्या हाॅलमध्ये शिबिराचे उद्घाटन पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवीण दुर्गुळे, अंकुश माने यांच्या ...
येथील देवांग कोष्टी समाजाच्या हाॅलमध्ये शिबिराचे उद्घाटन पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवीण दुर्गुळे, अंकुश माने यांच्या क्रिकेटप्रेमी, युवकांनी रक्तदान केले.
संताजी भोसले प्रास्ताविकात म्हणाले, जिल्ह्यावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी, तसेच जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने या आपत्कालीन परिस्थितीत रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. संतोष माळी यांनी आभार मानले.
यावेळी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, प्रविता सालपे, संदीप पाटील, संतोष गाताडे, अभिजित पोळ, अभिजित गायकवाड, डाॅ. स्मिता कुडाळकर, डाॅ. सूरज कुडाळकर, संतोष देसाई, सचिन चव्हाण, अभिनंदन सालपे, धनाजी केर्लेकर, सागर गुरव, सुकमार देसाई, रोहित माळी, प्रतीक शिंदे, आदी उपस्थित होते.
आधार ब्लड बँकेच्या वतीने डाॅ. प्रसन्न पुरोहित, स्नेहा बिराजदार, शुंभागी टकले, अभिनया पाटील, शुभम पाटील यांनी काम पाहिले.