७० पोलिसांवर ११५ गावांची सुरक्षा : करवीर तालुक्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:06 AM2019-07-23T00:06:29+5:302019-07-23T00:07:19+5:30

वाढती लोकसंख्या, उपनगरांंची वाढणारी संख्या यात वाढलेली गुन्हेगारी, ग्रामीण भागात वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडे लागणाऱ्या यंत्रणेचा अभाव करवीर पोलीस ठाण्यात दिसत आहे.

115 police protection in 70 police: Status of Karveer taluka | ७० पोलिसांवर ११५ गावांची सुरक्षा : करवीर तालुक्यातील स्थिती

करवीर पोलीस ठाण्यात जीर्ण झालेली पोलीस कोठडी बंद आवस्थेत असून, तिची दुरवस्था झाली आहे.

Next
ठळक मुद्देपाच पोलीस चौकींचीही दुरवस्था; २५ हजार लोकसंख्येला एक पोलीस

कोपार्डे : वाढती लोकसंख्या, उपनगरांंची वाढणारी संख्या यात वाढलेली गुन्हेगारी, ग्रामीण भागात वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडे लागणाऱ्या यंत्रणेचा अभाव करवीर पोलीस ठाण्यात दिसत आहे. खबरे, पोलीसमित्र यांची वानवा दिसत असल्याने जबरी चोºया, मारामाºया, खून घरफोड्यासारख्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात करवीर पोलिसांना यातायात करावी लागताना दिसत आहेत.

करवीर तालुका हा जिल्ह्यात सर्वांत मोठा अडीच प्लॉटचा तालुका म्हणून ओळखला जातो. हा तालुका कोल्हापूर शहराच्या जवळ असल्याने अस्ताव्यस्त वाढणारी उपनगरे, शहरालगत असणाºया गावांची वाढणारी लोकसंख्या, पोलीस ठाण्यापासून ६० ते ७० कि.मी. अंतरावर असणारी डोंगराळ भागातील गावे व वाड्यावस्त्या यांच्या सुरक्षेचा ताण करवीर पोलिसांवर पडत असल्याचे स्पष्ट चित्र पाहायला मिळते आहे.

करवीर बरोबर गांधीनगर पोलीस ठाणे असले तरी करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११५ गावे समाविष्ट आहेत. यातील २० गावे अतिसंवेदनशील आहेत, तर ५६ गावे संवेदनशील आहेत. यातील काही गावांंचे पोलीस ठाण्यापासूनचे अंतर ४० ते ५० कि.मी.पर्यंतचे आहे. एखाद्या गावात गुन्हा घडल्यास वेळेत या गावात पोहोचण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याचे स्पष्ट चित्र आहे. याचा परिणाम गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे शक्य नसल्याने अनेक जबरी चोऱ्यांचा उलगडा झालेला नाही.

करवीर पोलीस ठाण्याअंतर्गत चार पोलीस चौकी आहेत; पण त्या असून नसल्यासाख्याच असल्याने एखादी तक्रार करायची झाल्यास करवीर पोलीस ठाणे गाठावे लागते. येथेही येणाºया व्यक्तीस बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. महिला कर्मचारी व नागरिकांना ही असुविधाजनक परिस्थिती आहे. यामुळे समोरच असणाºया चिंचेच्या झाडाखाली बसावे लागते. पण, पावसाळ्यात येणाºया लोकांना फारच असुविधांचा सामना करावा लागतो.

मोठ्या चोºयांचा शोध कधी
भामटे येथे दूध संस्था फोडून पावणेचार लाख लंपास केले आहेत. कसबा बीड, सांगरूळ परिसरात झालेल्या दूध संस्थांमधील चोºयांचा शोध लागलेला नाही.

कुंभी-कासारी कारखान्यावर ज्वेलरी, मोबाईल शॉपी फोडण्यात आल्या असून, त्याबाबत संबंधितांना कोणतीही माहिती दिली जात नाही, अशा तक्रारी आहेत.

अलीकडेच यशवंत बँकेच्या बालिंगा शाखेवर पडलेला दरोडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शोधल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उठणारे प्रश्न कमी झाले.


खबरे, पोलीस मित्रांची वानवा
एखादा गुन्हा शोधण्यासाठी अथवा तो घडल्यानंतर पोलिसांना तत्पर माहिती मिळण्यासाठी खबरे व पोलीसमित्र यांची करवीर पोलिसांकडे वानवा आहे. तसा आत्मविश्वास व संवाद पोलिसासांकडून होत नसल्याने खबरे पोलिसांपासून लांबच आहेत.



करवीरला पोलीस कस्टडी नाही

करवीर तालुक्यातील जनता शांतता व सुव्यवस्था राखणारी आहे; पण येथे सुबत्ता असल्याने जबरी घरफोड्या, मारामाºया, दूध संस्थांवरील दरोडे, एटीएम मशीन फोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. यातील चोरट्यांपर्यंत पोहोचण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. एखादा गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागलाच तर त्याला गांधीनगर पोलीस कस्टडीत ठेवावे लागत असून, गुन्ह्याच्या चौकशीसाठी मोठ्या अडचणी येत असल्याचे चित्र आहे.

कार्यरत पोलीस कर्मचारी : ४पी. आय. १ ४साहाय्यक पो. निरीक्षक २ ४पीएसआय ४ ४ए एस आय ९ ४हेड कॉन्स्टेबल २४ ४पी एन २७ ४पोलीस कॉन्स्टेबल २०
 

सुरक्षेच्या कारणास्तव गांधीनगर येथे पोलीस कस्टडी हलविण्यात आली आहे. घडलेल्या गुन्ह्यांपैकी ७५ टक्के गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
- सुनील पाटील, पी.आय., करवीर पोलीस ठाणे

Web Title: 115 police protection in 70 police: Status of Karveer taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.