अंबपमध्ये ११८ जणांची चाचणी, सर्वजण निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:17 AM2021-06-21T04:17:18+5:302021-06-21T04:17:18+5:30
नवे पारगाव : अंबप (ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायतीने रविवारी गावातील ११८ जणांच्या केलेल्या अँटिजन चाचणीत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला ...
नवे पारगाव : अंबप (ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायतीने रविवारी गावातील ११८ जणांच्या केलेल्या अँटिजन चाचणीत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. गावाच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब असल्याची माहिती सरपंच बी. एस. अंबपकर, पोलीसपाटील पंढरीनाथ गायकवाड यांनी दिली.
गाव कोरोनामुक्त होण्यासाठी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांची अँटिजन चाचणी केली. आतापर्यंत गावात कोरोनाचे १४२ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ११३ बरे झाले आहेत तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचाराखाली केवळ २० रुग्ण आहेत.
अंबपचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश गायकवाड यांच्या पथकाने ही चाचणी केली. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विकासराव माने, सरपंच बी. एस. अंबपकर, उपसरपंच राजेंद्र माने, पोलीसपाटील पंढरीनाथ गायकवाड, तलाठी एकनाथ पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दातार, विस्तार अधिकारी खांडेकर, आरोग्य सहाय्यक अमृत पाटणकर, शिवदास पिंपळे, पुजारी उपस्थित होते.