लाईन बझार पतसंस्थेचा १२ टक्के लाभांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:25 AM2021-04-09T04:25:23+5:302021-04-09T04:25:23+5:30
कदमवाडी : अमृतमहोत्सवी लाईन बझार को-ऑप क्रेडिट सोसायटीची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यात सभासदांना ...
कदमवाडी : अमृतमहोत्सवी लाईन बझार को-ऑप क्रेडिट सोसायटीची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यात सभासदांना १२ टक्के लाभांश वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी दिली.
संस्थेच्या एकूण ठेवी १२ कोटी ३५ लाख असून ऑडिट वर्ग ‘अ’ आहे. संस्थेने नुकतेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यावेळी उपाध्यक्ष अतुल परब, संचालक लक्ष्मण गायकवाड, श्यामराव देवकुळे, शिवराज सावंत, महमंदरफी शेख, गजानन जाधव, सुदाम खाडे, राहुल गावडे, विनायक सावंत, संजीवनी पाटील, नजराना शेख व कार्यकारी संचालक समिउल्ला लतिफ आदी उपस्थित होते.
व्यंकटेश पतसंस्थेस ३९ लाखांचा नफा
कोल्हापूर : येथील व्यंकटेश नागरी पतसंस्थेस २०२०-२१ या अर्थिक वर्षात ३९ लाख २२ हजार इतका नफा झाला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अरुण काटवे यांनी दिली.
ग्राहकांच्या सोईसाठी संस्थेची शहरात मध्यवर्ती वांगी बोळ, महाद्वार रोड येतील शाखेत वीज बिल भरण्याची सोय आहे. लाॅकर्स सुविधादेखील उपलब्ध आहे. संस्थेत बँकिंग क्षेत्रात मिळणाऱ्या सर्व सुविधा आपल्या संस्थेमार्फत दिल्या जातात. त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही अध्यक्ष काटवे यांनी केले.