फुग्यात वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या स्फोटात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 03:48 PM2019-11-17T15:48:53+5:302019-11-17T15:49:58+5:30

इचलकरंजी येथील स्वामी मळ्यात फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस टाकीचा भीषण स्फोट झाला आहे.

12 year old girl dies in gas explosion in ichalkaranji | फुग्यात वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या स्फोटात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

फुग्यात वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या स्फोटात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

Next

इचलकरंजी - इचलकरंजी येथील स्वामी मळ्यात फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस टाकीचा भीषण स्फोट झाला आहे. त्यामध्ये 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. सना पठाण असे मुलीचे नाव आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर नाक्यावरील स्वामी मळा परिसरात सना पठाण ही मुलगी दारात खेळत होती. त्यावेळी तेथे असलेल्या फुगे फुगवण्याच्या गॅस सिंलिडरचा अचानक स्फोट झाला. त्यामध्ये सना ही गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तातडीने आयजीएम रुग्णालयात नेले. त्यावेळी सनाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय निकामी झाले होते. तिला प्राथमिक उपचार करून तातडीने कोल्हापूरला हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. 
 

Web Title: 12 year old girl dies in gas explosion in ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.