राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १२० प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:38 AM2020-12-13T04:38:32+5:302020-12-13T04:38:32+5:30
हातकणंगले तालुका विधि सेवा समिती, इचलकरंजी तथा जिल्हा न्यायालय १ यांच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ...
हातकणंगले तालुका विधि सेवा समिती, इचलकरंजी तथा जिल्हा न्यायालय १ यांच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दाखलपूर्व ११४३ व न्यायालयातील प्रलंबित असलेली ३४९ प्रकरणे अशी एकूण १४९२ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यांतील दाखलपूर्व प्रकरणांपैकी ३३ व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी ८७ प्रकरणे अशी एकूण १२० प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून तीन कोटी ७८ लाख २० हजार ५७० इतकी वसुली करण्यात आली. या लोकअदालतीसाठी एकूण पाच पॅनल ठेवण्यात आले होते. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. पी. कोकरे, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. एस. भंडारी यांच्या विशेष प्रयत्नांतून एका दिवसात जास्तीत जास्त प्रकरणे निकाली करता आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही लोक न्यायालयामध्ये अनेक संस्था, बँका, पतसंस्थांचे कर्मचारी, अधिकारी व पक्षकार यांनी सहभाग घेतला.