‘दक्षिण’साठी १२५ कोटींचा निधी

By Admin | Published: May 8, 2016 12:47 AM2016-05-08T00:47:25+5:302016-05-08T00:47:25+5:30

अमल महाडिक : जनतेच्या विश्वासावरच कामे

125 crore fund for 'South' | ‘दक्षिण’साठी १२५ कोटींचा निधी

‘दक्षिण’साठी १२५ कोटींचा निधी

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी मागच्या दीड वर्षात राज्य सरकारकडून १२५ कोटींचा निधी खेचून आणण्यात आपण यशस्वी झालो. आता ही सर्व कामे सुरू झाली आहेत, असा दावा भारतीय जनता पक्षाचे आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. ज्या विश्वासाने ‘दक्षिण’मधील जनतेने मला निवडून दिले, त्यास पात्र राहण्याचा तसेच त्यांची कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण गेल्या दीड वर्षात केल्याचेही त्यांनी सांगितले.
निवडून आल्यापासून जनतेचा विश्वास आणि मतदारसंघातील रखडलेला विकास या दोन गोष्टींची पुरेपूर जाणीव ठेवून आपण मतदारसंघातील प्रत्येक गावाचा, वाड्यावस्त्यांचा तसेच शहरातील प्रभागांचा अभ्यास केला. प्रत्येक गावात पायाभूत सुविधांबरोबरच कोणती विकासकामे करणे आवश्यक आहेत, त्याचे नियोजन केले आणि त्यानुसार निधी आणण्याचे प्रयत्न केले. निधीतून होणाऱ्या कामांचा कसलाही गाजावाजा न करता मतदारसंघातील प्रत्येक गाव व प्रभाग सुविधांनी युक्त बनला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असून, या कामात आपणास राज्य सरकार तसेच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांचे सहकार्य मिळत असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
रंकाळा तलाव, पंचगंगा नदी शुद्धिकरण, शाहू वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआर रुग्णालय यासाठी पुढील वर्षभरात सुमारे १५० कोटींचा निधी आणण्याचा आपला प्रयत्न आहे, असे सांगत केवळ मतदारसंघच नाही तर संपूर्ण शहराच्या विकासाकरिता आपण प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले.
जो निधी मिळाला आहे, त्यातून चांगल्या दर्जाची कामे व्हावीत यासाठी माझा आग्रह आहे. जर कामे खराब झाली तर ठेकेदारावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तलाव, विहिरी यामधील गाळ काढणे, सर्वत्र मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, आॅक्सिजन पार्क उभारणे ही महत्त्वाची कामेही आपण लवकरच लोकसहभागातून हाती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 125 crore fund for 'South'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.