इचलकरंजीत १२९ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:41+5:302021-07-07T04:29:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : 'लोकमत रक्ताचं नातं' या उपक्रमांतर्गत आयोजित महारक्तदान शिबिरात १२९ जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये ९ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : 'लोकमत रक्ताचं नातं' या उपक्रमांतर्गत आयोजित महारक्तदान शिबिरात १२९ जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये ९ महिलांचाही समावेश होता. लायन्स ब्लड बॅँक इचलकरंजी, आधार ब्लड बॅँक इचलकरंजी, आवाडे समर्थक ग्रुप यांचे शिबिराला सहकार्य लाभले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरात 'लोकमत'च्यावतीने दोन ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त 'लोकमत'सोबत संयुक्तपणे घेतलेल्या शिबिरात ९३ जणांनी रक्तदान केले. आमदार प्रकाश आवाडे यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी 'ताराराणी'चे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, सन्मती बॅँकेचे अध्यक्ष सुनील पाटील, सभापती दीपक सुर्वे, विलास गाताडे, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, शेखर शहा, बाळासाहेब कलागते, नरसिंह पारीक, बाबासाहेब पाटील, चंद्रकांत इंगवले, महावीर कुरूंदवाडे, शंकर येसाटे, सुहास जाधव, श्रीकांत टेके, संजय केंगार, नजमा शेख उपस्थित होते.
त्याचबरोबर लायन्स क्लब सभागृहामध्ये पार पडलेल्या शिबिरात ३६ जणांनी रक्तदान केले. उद्घाटनप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड यांच्यासह लायन्स ब्लड बॅँकेचे अध्यक्ष विजय राठी, खजिनदार विनय महाजन, संचालक सूरज दुबे, डॉ. व्ही. जी. कुलकर्णी, प्रभा चांदेकर आदी उपस्थित होते. तसेच नगरसेवक रवींद्र माने, नगरसेविका ध्रुवती दळवाई, अमृत भोसले, आदींचे सहकार्य लाभले. यावेळी 'लोकमत' चे जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) श्रीराम जोशी, इचलकरंजी कार्यालयप्रमुख अतुल आंबी, वितरण अधिकारी शिराज भोरे, जाहिरात प्रतिनिधी विक्रांत चौहान, उत्तम पाटील, फिरोज मणियार, विनायक शिंपुकडे, अक्षय पोवार, सोहन माने, संजय कल्याणकर, संजय कुंभार, सखी मंच समिती सदस्य वैशाली डोंगरे, बिना कारेकर, संगीता गजरे, अंजली आंबी, स्नेहल घाडगे उपस्थित होते.
रक्तदान करून तुटवडा भरून काढा
राज्यातील रक्ताचा तुटवडा पाहता जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून हा तुटवडा भरून काढावा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.
४६ वेळा केले रक्तदान
रुकडी (ता.हातकणंगले) येथील सुनील मारुती भारमल (वय ३८) यांनी आतापर्यंत ४६ वेळा रक्तदान केले आहे. राघोबा पाटील तालीम मंडळाचे ते अध्यक्ष आहेत.
महिलेने केले ४० वेळा रक्तदान
अलका बाळू कोरे (वय ५१, रा. शिरदवाड, ता.शिरोळ) या इचलकरंजी नगरपालिकेत काम करीत असून, त्यांनी आजतागायत ४० वेळा रक्तदान केले आहे. त्याचबरोबर त्यांनी मरणोत्तर देहदानही केले आहे.
फोटो ओळी
०५०७२०२१-आयसीएच-०३
इचलकरंजीत 'लोकमत' महारक्तदान शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दीपप्रज्वलनाने केले. यावेळी सुरज दुबे, विनय महाजन, विजय राठी, श्रीराम जोशी, अतुल आंबी, शिराज भोरे उपस्थित होते.
०५०७२०२१-आयसीएच-०४
ताराराणी पक्ष कार्यालयात झालेल्या 'लोकमत' महारक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी प्रकाश दत्तवाडे, सुनील पाटील, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, शेखर शहा, बाळासाहेब कलागते, नरसिंह पारीक, बाबासाहेब पाटील, चंद्रकांत इंगवले, आदी उपस्थित होते.
सर्व छाया-उत्तम पाटील