करवीर पंचायत कर्मचारी पतसंस्थेतर्फे १३ टक्के लाभांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:33 AM2020-12-30T04:33:43+5:302020-12-30T04:33:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदांना १३ टक्के लाभांश देण्याचा निर्णय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदांना १३ टक्के लाभांश देण्याचा निर्णय संस्थेच्या एकोणिसाव्या वार्षिक सभेत घेण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष रंगराव पाटील वाशीकर अध्यक्षस्थानी होते. यापूर्वीच्या संचालक मंडळाची मंजुरी घेऊन कायम ठेवीवर १२ टक्के दराने व्याज अदा करण्यात आले.
प्रास्ताविकात अध्यक्ष पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. कोरोनाच्या काळातही संस्थेने चांगले काम करून दाखविले व गतवर्षीपेक्षा ७४ हजार रुपयांचा नफा जास्त झाला. संस्थेचे २१८ सभासद असून यावर्षी १८ लाख ५४ हजार रुपयांचा नफा झाला आहे. सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे अध्यक्ष पाटील यांनी दिली.
सभेमध्ये निवृत्त दहा सभासदांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावी-बारावीमध्ये यश संपादन केलेल्या सभासदांच्या मुलांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
सभेला संस्थापक व्ही. पी. साबळे, संचालक सर्वश्री हंबीरराव पाटील, आर. जी. पाटील, एफ. एम. फरास, सरदार जाधव, संजय सुतार, अतुल कारंडे, कृष्णात गुरव, पी. एम. चव्हाण, सुरेश शेंडगे, विद्या व्हटकर व उर्मिला पाटील आदी उपस्थित होते.
स्वागत विलास राबाडे यांनी केले. सागर पोवार यांनी आभार मानले.
२९१२२०२०-कोल-करवीर पतसंस्था सत्कार
करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष रंगराव पाटील यांच्याहस्ते निवृत्त कर्मचाऱ्यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवर संचालक उपस्थित होते.