वडगाव सराफ पतसंस्थेच्या सभासदांना १३ टक्के लाभांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:23 AM2021-02-07T04:23:05+5:302021-02-07T04:23:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : येथील वडगाव सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २४ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली. अध्यक्षस्थानी ...

13% dividend to members of Wadgaon Saraf Credit Union | वडगाव सराफ पतसंस्थेच्या सभासदांना १३ टक्के लाभांश

वडगाव सराफ पतसंस्थेच्या सभासदांना १३ टक्के लाभांश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : येथील वडगाव सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची २४ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष व नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते. यावेळी सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर केला.

येथील संस्थेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या सभेत विषय पत्रिकेवरील विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, बापूसाहेब कोरे, संतोष पुरोहित आदींचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक उपाध्यक्ष सुभाष म्हेत्तर यांनी केले. अहवाल वाचन व्यवस्थापक बाळासाहेब पाटील यांनी केले. यावेळी माळी यांनी संस्थेकडे ३६ कोटी २४ लाखांचा ठेवी आहेत. २४ कोटी कर्ज दिली असून, वसूल भागभांडवल ३० लाख इतके आहे. खेळते भागभांडवल ३९ कोटी ९४ लाख आहे. नफा १८ लाख इतका झाला आहे. यावर्षी संस्थेचा रौप्यमहोत्सव असून, सभासदांना सुवर्ण भेट देण्याचा मानस आहे; तर माजी खासदार माने यांनी सराफ पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळेच नेत्रदीपक प्रगती केली आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्षा अजय थोरात, रघुनाथ नांगरे, शरद गुरव, संतोष गाताडे यांची भाषणे झाली.

या सभेस उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, प्रविता सालपे, सुनीता पोळ, शबनम मोमीन, मैमून कवठेकर, शरद पाटील, सुनील कुडाळकर आदींसह सभासद, नगरसेवक उपस्थित होते. संजय मिसाळ यांनी आभार मानले.

फोटो

पेठवडगाव : येथील वडगाव सराफ व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या २४ व्या वार्षिक सभेत बोलताना संस्थाध्यक्ष व नगराध्यक्ष मोहनलाल माळी, व्यासपीठावर उपनगराध्यक्षा संतोष चव्हाण, माजी खासदार निवेदिता माने, सुनीता पोळ, अजय थोरात, सुनील कुडाळकर आदी.

Web Title: 13% dividend to members of Wadgaon Saraf Credit Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.