२६ ग्रामपंचायतींसाठी १३ निवडणूक निर्णय अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:39 AM2020-12-16T04:39:01+5:302020-12-16T04:39:01+5:30

आजरा : आजरा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गावागावांत मोर्चेबांधणी सुरू आहे. २६ ग्रामपंचायतींसाठी १३ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले ...

13 Returning Officers for 26 Gram Panchayats | २६ ग्रामपंचायतींसाठी १३ निवडणूक निर्णय अधिकारी

२६ ग्रामपंचायतींसाठी १३ निवडणूक निर्णय अधिकारी

Next

आजरा : आजरा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गावागावांत मोर्चेबांधणी सुरू आहे. २६ ग्रामपंचायतींसाठी १३ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. २३ डिसेंबरपासून प्रत्यक्ष अर्ज भरणेस सुरूवात होणार आहे. निवडणुका होणाऱ्या २६ ग्रामपंचायतींच्या व गावचावडीच्या फलकांवर निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे.

तालुक्यातील बेलेवाडी हु, महागोंड, हालेवाडी, जाधेवाडी, चव्हाणवाडी, चिमणे, मुमेवाडी, खोराटवाडी, देवकांडगाव, देवर्डे, हाळोली, गवसे, कासारकांडगाव, होनेवाडी, मुरूडे, हत्तीवडे, शिरसंगी, पेद्रेवाडी, किणे, सरोळी, वाटंगी, मलिग्रे, सुळे या २६ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक होणार म्हणून अनेक इच्छुकांनी गेले ६ महिन्यांपासून जोरदार तयारी केली आहे. सध्या या गावांमध्ये निवडणुकीचा ज्वर चढला आहे. पॅनेल रचनेसंदर्भात गटनिहाय बैठका सुरू आहेत.

निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबर या दिवशी अर्ज भरणे, छाननी ३१ डिसेंबर, माघार ४ जानेवारी २०२१ दुपारी ३ पर्यंत, अंतिम उमेदवार यादी व चिन्हांचे वाटप ४ जानेवारी दुपारी ३ नंतर असा कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणुकीसाठी ग्रामपंचायतनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी असे - डी. डी. माळी - पंचायत विस्तार अधिकारी (बेलेवाडी हु, महागोंड), आर. एस. गवळी - सांख्यिकीय विस्तार अधिकारी (हालेवाडी, जाधेवाडी), एस. आर. खोराटे- कृषी अधिकारी (चव्हाणवाडी, चिमणे), पी. जी. चव्हाण - पंचायत विस्तार अधिकारी (देवकांडगाव, देवर्डे), ए. बी. मासाळ - कृषी विस्तार अधिकारी (हाळोली, गवसे), डी. जे. कातकर -कृषी पर्यवेक्षक (कासारकांडगाव, होनेवाडी), सूर्यकांत गुरव - कृषी पर्यवेक्षक (मुरूडे, हत्तीवडे), सूर्यकांत नाईक - कनिष्ठ अभियंता (शिरसंगी, पेद्रेवाडी), पांडुरंग मुळीक - उपअभियंता (किणे, सरोळी), गोरखनाथ पाटील - मंडल कृषी अधिकारी (वाटंगी, कोवाडे), व्ही. एम. शिंत्रे - कृषी पर्यवेक्षक (एरंडोळ, निंगुडगे), दत्तात्रय किल्लेदार - अधीक्षक पंचायत समिती आजरा (मलिग्रे, सुळे) निवडणूक निर्णय अधिकारी यांना सहाय्यक म्हणून संबंधित गावातील ग्रामसेवकांची नियुक्ती केली आहे.

Web Title: 13 Returning Officers for 26 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.