शिवाजी विद्यापीठात १३ हजार रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:48 AM2018-07-02T11:48:03+5:302018-07-02T11:50:27+5:30

राज्य शासनाच्या तेरा कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत शिवाजी विद्यापीठात सुमारे तेरा हजार रोपांच्या लागवडीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी प्रारंभ करण्यात आला.

13 thousand seedlings planted at Shivaji University | शिवाजी विद्यापीठात १३ हजार रोपांची लागवड

कोल्हापुरात रविवारी शिवाजी विद्यापीठात तेरा हजार वृक्षलागवड अभियानाचा प्रारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी शेजारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार, डॉ. डी. आर. मोरे, आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात १३ हजार रोपांची लागवडचंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रारंभ; वृक्ष जगण्याचा दर ९० टक्के

कोल्हापूर : राज्य शासनाच्या तेरा कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत शिवाजी विद्यापीठात सुमारे तेरा हजार रोपांच्या लागवडीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

या वर्षी विद्यापीठाने वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने परिसरात तेरा हजार वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. त्याचा प्रारंभ विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक परिसरात सकाळी पावणेअकरा वाजता पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला.

यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, आदी उपस्थित होते.

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत विद्यापीठाने प्रभावी कामगिरी बजावली आहे. लावलेल्या वृक्षांचा जगण्याचा दर ९० टक्क्यांपर्यंत आहे. दरम्यान, पब्लिक रिलेशन्स कौन्सिल आॅफ इंडियाच्या (पीआरसीआय) कोल्हापूर चॅप्टरच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या परिसरात बोधिवृक्षांची लागवड केली.

यावेळी ‘पीआरसीआय’च्या कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष आलोक जत्राटकर, उपाध्यक्ष सतीश ठोंबरे, खजिनदार राजेश शिंदे, सहसचिव रविराज गायकवाड, आदी उपस्थित होते.

जांभूळ, पिंपळाची लागवड

विद्यापीठाच्या क्रीडासंकुल परिसरात जांभूळ व पिंपळ वृक्षांची लागवड कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिर्के, डॉ. पी. डी. राऊत, ए. एम. गुरव, आर. व्ही. गुरव, डी. के. गायकवाड, पी. टी. गायकवाड, अधिसभा सदस्य यशवंत भालकर, संजय जाधव, एन. बी. गायकवाड, आदी उपस्थित होते.

 

Web Title: 13 thousand seedlings planted at Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.