१३३२ जणांना ई-पास नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:25 AM2021-04-25T04:25:08+5:302021-04-25T04:25:08+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या जिल्हाबंदीत जिल्ह्याबाहेर एक दिवस जाण्यासाठी शनिवारी दिवसभरात सुमारे १६१७ जणांनी कोल्हापूर पोलीस दलाच्या संकेतस्थळावर ...
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या जिल्हाबंदीत जिल्ह्याबाहेर एक दिवस जाण्यासाठी शनिवारी दिवसभरात सुमारे १६१७ जणांनी कोल्हापूर पोलीस दलाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून ई-पासची मागणी केली, पण त्यापैकी फक्त २८१ जणांच्या ई-पासला प्रशासनाने मंजूर दिली.
घरातील व्यक्तीचे लग्न, घरातील नातेवाइकाचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य तसेच अडकून पडलेल्यांना जिल्हाबाहेर जाण्यासाठी पोलीस दलाकडून ई-पास देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. हा ई-पास केवळ अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या कारणांसाठीच पोलिसांकडून दिला जात आहे. त्यासाठी योग्य कारणे असलेल्या कागदपत्रांची पूर्तता अर्जदारास करावी लागत आहे. ती कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर अपलोड करावी लागतात. त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात जाणार, परत कधी येणार, प्रवासाचे सबळ कारण आदी नमूद करावे लागत आहे.
त्या पद्धतीने शनिवारी एका दिवशी तब्बल १६१७ जणांनी ई-पासची मागणी केली, तर त्यापैकी सबळ कारण नसल्याने १३३२ जणांना ई-पास नाकारला, तर फक्त २८१ जणांना ई-पासची मंजुरी देण्यात आली. मंजूर झालेल्या ई-पासची वैधता संपली होती.
- ई-पाससाठी कोल्हापूर पोलीस दलाचे संकेतस्थळ : http//covid19.mhpolice.in /