जिल्ह्यात कोरोनाचे १३४ नवे रुग्ण, पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:28 AM2021-09-06T04:28:44+5:302021-09-06T04:28:44+5:30
कोल्हापूर शहरामध्ये ३९, तर करवीर तालुक्यात २१, हातकणंगलेमध्ये १५, शिरोळ येथे १२, गडहिंग्लज तालुक्यात आठ रुग्णांची नोंद ...
कोल्हापूर शहरामध्ये ३९, तर करवीर तालुक्यात २१, हातकणंगलेमध्ये १५, शिरोळ येथे १२, गडहिंग्लज तालुक्यात आठ रुग्णांची नोंद झाली आहे. इचलकरंजी नगरपालिकेच्या हद्दीत सहा आणि जयसिंगपूर नगरपालिका क्षेत्रात सात रुग्ण सापडले आहेत. एकूण पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात तरसंबळे (ता. राधानगरी) येथील ५२ वर्षीय, मुरगुड (ता. कागल) येथील मेंडकेनगरातील ५५ वर्षीय आणि पाचगाव (ता. करवीर) येथील ६२ वर्षीय नागरिकाचा समावेश आहे. कोल्हापुरात उपचार घेणाऱ्या जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये हंचनाळ (ता.चिक्कोडी) येथील ६२ वर्षीय आणि कणकवली (जि. सिंधुदूर्ग) येथील शिवाजीनगरमधील ७८ वर्षांच्या नागरिकाचा समावेश आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे १९९ प्राप्त अहवालापैकी १९४ अहवाल निगेटिव्ह, तर पाच अहवाल पॉझिटिव्ह आले. ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे ५३१ प्राप्त अहवालापैकी ५०५ अहवाल निगेटिव्ह, तर २६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खासगी रुग्णालये अथवा लॅबमध्ये ४७२८ प्राप्त अहवालापैकी ४६२५ निगेटिव्ह आणि १०३ पॉझिटिव्ह असे एकूण १३४ अहवाल पॉझिटिव्ह आहेत.