राजाराम कारखान्याचे १३४६ सभासद अपात्रच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:34 AM2021-02-26T04:34:44+5:302021-02-26T04:34:44+5:30

जे. एल. पाटील व माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जे. एल. पाटील म्हणाले, ...

1346 members of Rajaram factory are ineligible | राजाराम कारखान्याचे १३४६ सभासद अपात्रच

राजाराम कारखान्याचे १३४६ सभासद अपात्रच

Next

जे. एल. पाटील व माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जे. एल. पाटील म्हणाले, गेल्या वीस-पंचवीस वर्षांत बोगस सभासदांच्या जिवावर राजकारण केलेल्यांना आता निवडणूक लढविण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्येष्ठ सभासद दत्तात्रय उलपे म्हणाले, न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून, न्यायदेवता योग्यच न्याय देत असते हे यामुळे दिसून आले आहे. सहकारमंत्र्यांच्या या निर्णयामुळे लोकशाहीवरील विश्वास वृद्धिंगत झाला आहे.

सभासदांबाबत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने एकूण १८९९ हरकती दाखल केल्या होत्या. याबाबतची सुनावणी कोल्हापूरच्या प्रादेशिक सहसंचालकांनी घेऊन ४८४ सभासद पात्र ठरविले होते. यापैकी मृत व दुबार असे ६९ वगळून अपात्र १००८ व कार्य क्षेत्राबाहेरील ३३८ अशा १३४६ सभासदांना प्रादेशिक सहसंचालकांनी अपात्र ठरविले होते. अपात्र सभासदांपैकी ८०६ जणांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे अपील दाखल केले होते. याबाबत त्यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनी अपात्र सभासदांचे व कारखान्यांनी केलेले अपील फेटाळून लावले व प्रादेशिक सहसंचालकांनी १४ फेब्रुवारी २०२० रोजी दिलेला निर्णय कायम ठेवला. यावेळी आघाडीच्या वतीने साखर, पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

Web Title: 1346 members of Rajaram factory are ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.