१४ व्यापाऱ्यांविरोधात वडगावात गुन्हा दाखल

By admin | Published: December 12, 2015 12:42 AM2015-12-12T00:42:03+5:302015-12-12T00:53:26+5:30

हडपले १५ लाख : कापसाचा ‘व्हॅट’ भरलाच नाही

14 cases registered in Vadga against 14 businessmen | १४ व्यापाऱ्यांविरोधात वडगावात गुन्हा दाखल

१४ व्यापाऱ्यांविरोधात वडगावात गुन्हा दाखल

Next

पेठवडगाव : ‘व्हॅट’ची रक्कम शासनास न भरता परस्पर हडप करून १५ लाख २५ हजार ७५५ रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी इंदोर, धुळे, उज्जैन, धरमपुरी, आदी ठिकाणच्या १४ कापूस व्यापाऱ्यांच्या विरोधात वडगाव पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संबंधित व्यापाऱ्यांनी २00९ ते २0१0 या वर्षात आर. एम. मोहिते इंडस्ट्रीजच्या महालक्ष्मी कॉटन ग्रोज कंपनीला कापूस पुरविला होता. या कापसाच्या बिलाची रक्कम घेताना ‘व्हॅट’ची रक्कम व्यापाऱ्यांनी शासनास भरणे आवश्यक होते. मात्र, ती रक्कम न भरता फसवणूक केली. तसेच १५ लाख २५ हजारांचा अपहार केला. ही रक्कम शासनास न भरल्यामुळे या (व्हॅट) चा परतावा मिळू शकला नाही. त्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करीत आहेत. याप्रकरणी महालक्ष्मी कॉटन चिनीग इंडस्ट्रीजच्यावतीने किरण मोहिते यांनी फिर्याद दिली.

व्यापाऱ्यांची नावे
अजय मित्तल, रमेशकुमार नंदकिशोर मित्तल, अजय ग्रेवाल, मनोज गिरधारीलाल सैनी, मंगलसिंग सुरेंद्रसिंग चौहान, सचिन माणिकलाल रावल, प्रवीण रमेश मिश्रा (सर्व रा. इंदोर, मध्य प्रदेश), सुनीलकुमार दीपचंद जैन, जवरीलाल वर्जलाल जैन (दोघे धुळे), नरेश रंगनाथ वाणी, राम जडेजा (रा. जळगाव), विकास राम तिवारी (उज्जैन), नितीशकुमार कैलासचंद्र गर्ग, विकास राम तिवारी (धरमपुरी, बिहार), अशी गुन्हा नोंद झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.

Web Title: 14 cases registered in Vadga against 14 businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.